आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुरुलियापंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणूक तारखा जाहीर झाल्यानंतर गुरुवारी पश्चिम बंगालमध्ये दुसरी जाहीर सभा घेतली. त्यांनी बांगला भाषेतून भाषणाला सुरुवात केली. पुरुलियातील स्थानिक समस्या मांडतानाच त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावरही निशाणा साधला. ममतांच्या ‘खेला होबे’ चा उल्लेख करून मोदी म्हणाले, आता बंगालमध्ये ‘विकास होबे’. ममतांच्या चंडी पाठाबद्दल मोदी म्हणाले, दहा वर्षे तुष्टीकरण केल्यानंतर ममतादीदी अचानक बदलल्यासारख्या वाटू लागल्या आहेत. हे हृदयपरिवर्तन नव्हे तर पराभवाची भीती आहे. पुरुलियातील घराघरापर्यंत अजूनही पाणी पोहोचू शकलेले नाही. आधी डाव्यांनी, नंतर तृणमूलने राज्यात उद्योग वाढू दिले नाहीत. बंगाल व पुरुलियाच्या विकासासाठी राज्यात डबल इंजिनचे सरकार आवश्यक आहे, असे आवाहन मोदींनी केले.मोदींच्या सभेनंतर ममतांनी पश्चिम मिदनापूरमध्ये जाहीर सभा घेतली. पुन्हा एकदा त्यांनी चंडी पाठाबरोबरच व्हीलचेअरवर बसून आपले भाषण केले. ममता म्हणाल्या, मी वाघाची मुलगी आहे. मी मस्तक झुकवणार नाही. मी केवळ जनतेसमोर झुकते.
विकासासाठी डबल इंजिन सरकारची गरज : मोदी
बंगालच्या पुरुलियात सभेच्या सुरूवातीला मोदींनी महिलांचा गौरव केला. येथे पिण्याच्या पाण्याची सुविधा घरोघर नाही. विकासात पिछाडीवर पडल्यामुळे सर्वाधिक त्रास महिलांच्या वाट्याला आल्याचे मोदींनी सांगितले.
आसामला काँग्रेसने बरबाद केले
आसामच्या करीमगंजमध्ये मोदींनी सभा घेतली. काँग्रेस सरकार व त्यांच्या धोरणांमुळे आसामची सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक पातळीवर हानी झाली, असा आरोप करून ते म्हणाले, आम्ही आसामला देशाशी जोडण्याचे काम केले आहे.
प्रधान यांच्या रॅलीवर हल्ला
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान गुरुवारी नंदीग्राममध्ये शुभेंदू अधिकारी यांच्या प्रचारात होते. रॅलीदरम्यान काही लोकांनी माझ्यासमोर युवा मोर्चाच्या अध्यक्षावर हल्ला केला. आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत, असे ते महणाले.
हे तर ट्रान्सफर माय कमिशन
आमचे धोरण डीबीटी म्हणजे थेट लाभार्थीपर्यंत निधी पोहोचवणे. बंगालमध्ये टीएमसी धोरण आहे. टीएमसी म्हणजे ट्रान्सफर माय कमिशन. पण आम्ही थेट लोकांपर्यंत पाेहोचवतो, असा टोला मोदींनी लगावला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.