आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पश्चिम बंगाल:भाजपचा दावा- दुसऱ्या पक्षातील 100 नेते भाजपत येण्यास तयार, सर्वाधिक टीएमसीचे

नवी दिल्ली18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पश्चिम बंगाल : 12 आमदारांना वाईट प्रतिमेमुळे प्रवेश नाही

पश्चिम बंगालमध्ये इतर पक्षांतील नेत्यांचे भारतीय जनता पक्षात येणे सुरूच आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्याच्या माहितीनुसार आमच्याकडे भाजपत येऊ इच्छिणाऱ्या शंभर नेत्यांची यादी आहे. यात सर्वाधिक तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) आहेत. बहुतांश आमदार, खासदार, माजी आमदार- खासदार, पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत. मात्र, ज्यांची प्रतिमा स्वच्छ व प्रामाणिक असेल त्यांना पक्षात प्रवेश दिला जाईल. त्यांनी सांगितले की, भाजपत येण्यासाठी तृणमूल काँग्रेसचे १२ आमदार तयार आहेत. मात्र, त्यांची प्रतिमा चांगली नसल्याने आम्ही त्यांना थांबवून ठेवले आहे. चौकशी केल्यानंतरच त्यांच्याबाबत निर्णय घेऊ.भाजपत २०१९पासून आतापर्यंत २८ वरिष्ठ नेत्यांनी प्रवेश केला आहे.

नाकारलेले व कलंकितच सोडताहेत, कार्यकर्ते नव्हे : रॉय
टीएमसीचे प्रवक्ते आणि खासदार प्रा. सौगत रॉय म्हणाले की, जेवढा माध्यमात प्रचार होत आहे तेवढे नेते तृणमूल साेडत नाहीयेत. अद्याप १०-१२ पेक्षा जास्त आमदार सोडून गेलेले नाहीत. आणखी दोन-चार जातील. मात्र, जे नेते जात आहेत त्यांच्यासोबत कार्यकर्ते नाहीत. म्हणून पक्षाला फरक पडणार नाही.

बातम्या आणखी आहेत...