आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • West Benga Saradha Scam Case Update; Mamta Banerjee TMC Party Firhad Hakim, Madan Mitra Arested By CBI

बंगालमध्ये पुन्हा CBI vs दीदी:मंत्र्यांच्या अटकेनंतर भडकले तृणमूल समर्थक, CRPF जवान आणि CBI ऑफिसवर दगडफेक, ममतांविरुद्ध FIR

कोलकाताएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नारदा स्टिंगनंतर CBI तपास सुरू झाला

बंगालच्या नारदा प्रकरणात पुन्हा एकदा केंद्रीय गुन्हे अन्वेषण(CBI) ने तपास सुरू केला आहे. सीबीआयने सोमवारी अनेक ठिकाणी छापेमारी केली. यानंतर ममता सरकारमधील मंत्री फिरहाद हाकिम, सुब्रत मुखर्जी, आमदार मदन मित्रा आणि माजी महापौर शोवन चॅटर्जी यांची चौकशी करुन सर्वांना अटक करण्यात आले. आता या सर्वांना कोर्टात हजर केले जाणार आहे. सीबीआय कोर्टाकडे या चौघांच्या कस्टडीची मागणी करू शकते.

या कारवाईदरम्यान पुन्हा एकदा केंद्र आणि बंगाल सरकार आमने-सामने आलेले दिसत आहेत. आपल्या मंत्र्यांच्या चौकशीदरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सीबीआयच्या कार्यालयात दाखल झाल्या. मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी त्या सीबीआयला म्हणाल्या- मलाही अटक करा. सरकारच्या वकीलाने म्हटले की, नोटिस दिल्याशिवाय मंत्री आणि आमदारांना अटक करता येत नाही. ममता CBIच्या कार्यालयात गेल्यानंतर तृणमूल कार्यकर्तेही तेथे जमले आणि दगडफेक केली. यानंतर पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला.

बंगालमध्ये बऱ्याच ठिकाणी सीआरपीएफ जवान, सीबीआय कर्मचारी आणि भाजप कार्यकर्त्यांवर हल्ल्याचीही माहिती समोर येत आहे. यानंतर बंगाल भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी ममता बॅनर्जी यांच्याविरूद्ध राज्यात हिंसाचार पसरवल्याबद्दल एफआयआर दाखल केला आहे. याची एक प्रत राज्यपाल जगदीप धनखड यांनाही पाठवली आहे.

नारदा स्टिंगनंतर CBI तपास सुरू झाला

2016 मध्ये बंगालच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी नारदा न्यूज पोर्टलने टेप जारी केले होते. या स्टिंग ऑपरेशननंतर दावा करण्यात आला की, टेप 2014 मध्ये रेकॉर्ड केले आहेत. टेपच्या हवाल्याने तृणमूलचे मंत्री, खासदार आणि आमदारांना डमी कंपन्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप लावला होता. हायकोर्टाने 2017 मध्ये याचा तपास CBIकडे सोपवला होता.

बातम्या आणखी आहेत...