आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • West Bengal As Soon As The Session Started The Governor Left The Assembly After Reading A Four minute Speech

पश्चिम बंगाल:सत्र सुरू होताच वाद, ...चार मिनिटे अभिभाषण वाचून राज्यपालांनी विधानसभा सोडली

कोलकाताएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

प. बंगाल विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी सुरू झाले. राज्यपाल जगदीप धनखड यांनी अभिभाषण वाचनास सुरुवात केल्यानंतर ३-४ मिनिटांतच गोंधळ सुरू झाल्याने त्यांना गप्प व्हावे लागले. निवडणुकीनंतरच्या हिंसाचारावर भाजप आमदार हाती फलक घेऊन घोषणाबाजी करू लागल्याने त्यांनी सभागृह सोडले. तृणमूलने पाठवलेल्या अभिभाषणावरही त्यांनी आक्षेप घेतला होता. ते हिंसाचाराचे मुद्दे जोडू पाहत होते, पण सत्ताधारी पक्ष सहमत नव्हता. त्यामुळे त्यांनी अभिभाषण वाचण्यासही नकार दिला होता. राज्यपाल लिखित भाषणाशिवाय वेगळे काही बोलतील, असाही अंदाज वर्तवला जात होता.

बातम्या आणखी आहेत...