आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • West Bengal Assam Election 2021 Voting Percentage LIVE Update; Mamata Banerjee TMC BJP Party | Assembly (Vidhan Sabha) Election Latest News

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बंगाल, आसाममध्ये 77 जागांवर मतदान:बंगालमध्ये 3 वाजेपर्यंत 55.27%, आसाममध्ये 47.10% मतदान; ममतांचा मोदींवर हल्ला, म्हणाल्या - बांगलादेशात पंतप्रधानांनी बंगालवर भाषण देणे आचारसंहितेचे उल्लंघन

कोलकाता/ गुवाहाटीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बंगालच्या 30 आणि आसामच्या 47 जागांचा समावेश आहे

पश्चिम बंगाल आणि आसामच्या 77 जागांवर आज सकाळी 7 वाजेपासून पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. यामध्ये बंगालच्या 30 आणि आसामच्या 47 जागांचा समावेश आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत म्हणजेच 7 तासांमध्ये बंगालमध्ये 55.27% आणि आसाममध्ये 47.10% मतदान झाले. मतदान संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालेल. कोरोनामुळे मतदानाचा कालावधी 1 तासांसाठी वाढवण्यात आला आहे.

दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल नेत्या ममता बॅनर्जी यांनी खडगपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ममता म्हणाल्या की, निवडणुकींदरम्यान पंतप्रधान बांगलादेशात गेले आहेत आणि तिथे बंगालवर भाषण देत आहेत. हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे. आम्ही निवडणूक आयोगाकडे याची तक्रार करु.

60 पोलिंग बूथवर EVM सोबत छेडछाड केल्याची तक्रार समोर आली. काही ठिकाणी EVM मध्ये तांत्रिक अडचणीमुळे मतदारांना 2 तासांपर्यंत वाट पाहावी लागली. दुसरीकडे भाजपने आरोप लावला की, पुरुलियामध्ये TMC कँडिडेटने मतदारांना पैसे वाटले आहेत, याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.

बंगालमध्ये ज्या 30 जाकांवर मतदान होत आहे, त्यामधून 26 पहिल्यांदा म्हणजेच 2016 च्या विधानसभेच्या निवडणुकीत TMC च्या खात्यात गेल्या होत्या. दरम्यान भाजप नेता आणि शुभेंदु अधिकारींचे भाऊ सोमेंदु अधिकारींनी आरोप केला आहे की, TMC ने बूथ क्रमांक 149 वर मतदारांना प्रभावित करण्यासाठी अलाउद्दीन नावाच्या दहशतवाद्याला लावले आहे. याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.

मदिनापुरात 2 ठिकाणी हिंसेची घटना
पूर्वी मिदनापुरच्या भगवानपूर विधानसभआ परिसराच्या सतसतमलमध्ये फायरिंगची घटना घडली आहे. यामध्ये दोन सुरक्षादलाचे कर्मचारी जखमी झाले आहेत. भाजपचे जिल्हा अध्यक्ष अनूप चक्रवर्तींनी TMC च्या कार्यकर्त्यांवर आरोप लावत म्हटले आहे की, परिसरातील लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच पश्चिम मिदनापूरच्या सालबोनीमध्ये माकपा उमेदवार सुशांत घोषवर हल्ल्याचे वृत्त आहे. येथेही हल्ल्याचा आरोप TMC कार्यकर्त्यांवर लावण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...