आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापश्चिम बंगाल आणि असमच्या 69 जागांसाठी गुरुवारी दुसऱ्या टप्प्यातील मतदान जाले. बंगालमध्ये हिंसाचाराच्या काही घटना आणि बूथ कॅप्चरिंगच्या आरोपादरम्यान 80% पेक्षा जास्त मतदान झाले. निवडणूक आयोगाने सांगितल्यानुसार, सायंकाळी 6 वाजेपर्यंत बंगालमध्ये 80.43% आणि असाममध्ये 74.64 % मतदान झाले आहे. यापूर्वी पहिल्या टप्प्यात बंगालमध्ये 79.79% आणि असाममध्ये 72.14% मतदान झाले.
दरम्यान, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर मोठे आरोप केले आहेत. त्या म्हणाल्या की, निवडणुकीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचार कसा करू शकतात ? अमित शहा केंद्राने पाठवलेल्या सुरक्षारक्षकांना आदेश देत आहेत. हे आचार संहितेचे उल्लंघन आहे.
ममता पुढे म्हणाल्या की, उत्तर प्रदेश आणि बिहारवरुन आलेले लोक बंगालमधील वातावरण खराब करत आहेत. बाहेरुन आलेले गुंड मतदानात बाधा आणत आहेत. निवडणूक आयोगाकडे अनेकदा तक्रार करुनही कोणतीच कारवाई झाली नाही. याबाबत त्यांनी राज्यपालांकडे तक्रारही केली. त्या म्हणाल्या की, निवडणूक आयोगाने यावर काही कारवाई न केल्यास कोर्टात जाईन.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.