आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • West Bengal Assembly Election 2021 | Rahul Gandhi, Mamata Banerjee, Election Commission Of India (ECI), Coronavirus Latest News Update, Corona Cases In Bengal

राहुल गांधींनी बंगालमध्ये रद्द केल्या सभा:54 दिवसांमध्ये केवळ एकदाच प्रचार करण्यासाठी पोहोचले राहुल गांधी, म्हणाले - दुसऱ्या नेत्यांनीही या सभांच्या परिणामांचा अंदाज लावावा

नवी दिल्ली9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ममता म्हणाल्या - उर्वरीत तिन्हीही टप्प्यातील निवडणुका एकत्र घ्याव्यात

कोरोनाची गंभीर होत असलेली परिस्थिती पाहता राहुल गांधींनी बंगालमध्ये सध्या सर्वच निवडणूक सभा रद्द केल्या आहेत. आतापर्यंत झालेल्या 54 दिवसांच्या निवडणूक प्रचारांमध्ये राहुल केवळ एकदाच रॅलीसाठी बंगालमध्ये गेले, ते देखील चौथ्या टप्प्यानंतर गेले होते. त्यांनी दुसऱ्या पक्षांनाही सभा रद्द करण्याचे आवाहन केले आहे.

राहुल म्हणाले, 'कोरोनाची स्थिती पाहता मी पश्चिम बंगालमध्ये आपल्या सर्व सार्वजनिक सभा स्थगित करत आहे. मी सर्व राजकीय नेत्यांनाही सल्ला देईल की, त्यांनी सध्याच्या परिस्थितीत मोठ्या सार्वजनिक सभांच्या आयोजनाच्या परिणामांवर दिर्घ चर्चा करावी.'

ममता म्हणाल्या - उर्वरीत तिन्हीही टप्प्यातील निवडणुका एकत्र घ्याव्यात
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाला आवाहन केले आहे की, लोकांच्या सुरक्षेची काळजी घेत उर्वरीत 3 टप्प्यांच्या निवडणुका एकाच वेळी घ्याव्या. त्यांनी म्हटले की, आपण नेहमी 8 टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचा विरोध केला आहे. मला नाही वाटत की, कोरोना काळात राज्यात एवढा जास्त काळ निवडणूक व्हावी. आता परिस्थिती बिघडत आहे, म्हणून आम्ही निवडणूक आयोगाला आवाहन करतो की, त्यांनी यावर विचार करावा.

बातम्या आणखी आहेत...