आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • West Bengal Assembly Elections 2021 Latest News And Update; West Bengal Assembly Elections 2021, West Bengal Assembly Elections, CM Mamata Banerjee In Nandigram, CM Mamata Banerjee, BJP Shubhendu Adhikari, TMC Manifesto, Attack On Mamata

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बंगाल राजकारण:मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवरील हल्ल्याची तक्रार करण्यासाठी तृणमूल नेत्यांची निवडणूक आयोगाकडे धाव

कोलकाताएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाजप नेते म्हणाले- या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याची तक्रार करण्यासाठी तृणमूल नेते डेरेक ओब्रायन, राज्यमंत्री चंद्रिमा भट्‌टाचार्य आणि पार्थ चॅटर्जी यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. तत्पूर्वी, तृणमूलने यंदाच्या निवडणुकीसाठी घोषणा पत्र जाहीर करणार नसल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, पोलिसांनी तृणमूल नेते शेख सोफिया यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे. TMC ने या हल्ल्यामागे राजकीय षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. तसेच, यासाठी भाजपला जबाबदार ठरवले आहे.

डेरेक ओब्रायन यांनी भाजपवर लावले आरोप

तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी याप्रकरणी भाजपवर आरोप लावले आहेत. ते म्हणाले की, 9 मार्चला निवडणूक आयोगाने DGP ची बदली केली. 10 मार्चला भाजप खासदार दिलीप घोष पोस्ट करतात की, '5 वाजता काय होईल, हे तुम्हाला कळेल.' यानंतर 6 वाजता ममता दीदींवर हल्ला होतो.

भाजप नेते निवडणूक आयोगाकडे गेले

या घटनेनंतर भाजपचे प्रतिनिधिमंडल निवडणूक आयोगाकडे गेले. भाजप नेते सब्यसाची दत्ता आणि शिशी बजोरिया यांनी अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि याप्रकरणी गांभीर्याने तपास करण्याची मागणी केली.

बातम्या आणखी आहेत...