आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • West Bengal Bardwan Violence । Clashes In Galsi Due To Mutual Enmity, Many Houses Burnt; 31 Arrested

बंगालच्या बर्दवानमध्ये बीरभूमसारखा हिंसाचार:वैमनस्यातून एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर गलसीमध्ये हिंसक संघर्ष, अनेक घरे जाळली; 31 अटकेत

कोलकाता4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम बंगालच्या पूर्व बर्दवान जिल्ह्यातील गलसीमध्ये बीरभूमसारखी घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री परस्पर वैमनस्यातून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. हत्येनंतर मृतदेह गावात येताच हिंसाचार उसळला, हिंसाचारात अनेक घरे जाळण्यात आली. या घटनेनंतर गावात आरएएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

रिपोर्टनुसार, पूर्व बर्दवानमध्ये मनोज घोष आणि उत्पल घोष यांच्यात वाद झाला होता. वादानंतर मनोजने उत्पलचा कुऱ्हाडीने वार करून खून केला. साक्षीदारांनी मीडियाला सांगितले- उत्पलचा मृतदेह गावात येताच तेथे हिंसाचार उसळला. उत्पलच्या नातेवाईकांनी मनोज आणि त्याच्या शेजाऱ्यांच्या घरांना आग लावली. यासह आजूबाजूच्या कार आणि दुचाकीही संतप्त जमावाने जाळल्या.

31 अटकेत, RAF तैनात

या घटनेनंतर जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. हिंसाचार भडकावल्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 31 आरोपींना अटक केली आहे. सर्व आरोपींची चौकशी सुरू आहे. गावात आरएएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. बर्दवानचे माजी एसपी कामनाशीश सेन यांनी सांगितले की, आरोपी मनोज घोषला पोलिसांनी हत्येनंतरच अटक केली. त्याचबरोबर हिंसाचार भडकावणाऱ्यांनाही अटक करण्यात येत आहे. आम्ही कोणत्याही दोषीला सोडणार नाही.

गालसी येथील हिंसाचारानंतर गावात आरएएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत.
गालसी येथील हिंसाचारानंतर गावात आरएएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

हिंसाचारानंतर लोक घरातून पळून गेले

गलसी येथील हिंसाचारानंतर गावातील लोक घरे सोडून पळून गेले आहेत. पोलिसांच्या अटकेच्या आणि जाळपोळीच्या भीतीने लोक घरातून पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी घटनास्थळी पोहोचलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही येथे शांतता प्रस्थापित करण्याचा, लोकांना समजावण्याचा प्रयत्न करत आहोत.

पोलीस पथक गावात तपास करत असून हिंसाचारामागील हेतू शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
पोलीस पथक गावात तपास करत असून हिंसाचारामागील हेतू शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

बीरभूममध्ये झाला होता हिंसाचार

22 मार्च रोजी रामपुरहाट येथे तृणमूल नेत्याच्या हत्येनंतर बीरभूममध्ये हिंसाचार उसळला होता. या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास कलकत्ता उच्च न्यायालयाने सीबीआयकडे सोपवला होता. या हिंसाचारात पोलिसांनी तृणमूलच्या ब्लॉक प्रमुखासह अनेक आरोपींना अटक केली होती.

बातम्या आणखी आहेत...