आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • West Bengal BJP MLA Debendra Nath Roy Death News Updates: Bharatiya Janata Party (BJP) Party Leaders On Mamata Banerjee West Bengal Govt

खून की आत्महत्या?:फासावर लटकलेल्या अवस्थेत सापडला पश्चिम बंगालच्या भाजप आमदाराचा मृतदेह; भाजप म्हणे- खून! पोलिसांना सापडले सुसाइड नोट

कोलकाता22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाजप आमदाराच्या खिशातील सुसाइड नोटमध्ये 3 जणांना जबाबदार धरले आहे
Advertisement
Advertisement

पश्चिम बंगालमध्ये भाजपचे आमदार देबेंद्र नाथ रॉय (59) यांचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे. हा संशयास्पद मृत्यू प्रत्यक्षात खून आहे असा आरोप भारतीय जनता पक्षाने केला. सोबतच, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी यावरून थेट पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वामध्ये राज्यात गुंडाराज सुरू असून हे शासन पूर्णपणे फेल ठरले आहे. अशा सरकारला भविष्यात जनता माफ करणार नाही. तर दुसरीकडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देबेंद्र नाथ यांच्या खिशात सुसाइड नोट सापडले असून त्यामध्ये मृत्यूसाठी तीन जणांना जबाबदार धरण्यात आले आहे. या प्रकरणाचा सध्या सविस्तर तपास सुरू आहे.

हत्या करून मृतदेह लटकवल्याचा कुटुंबियांचा आरोप

देबेंद्र नाथ यांचा मृतदेह सोमवारी त्याच्या गावातील घरापासून एक किलोमीटर दूर एका किराणा दुकानासमोर लटकलेल्या अवस्थेत सापडला. त्याच्या कुटुंबियांनी आरोप सांगितल्याप्रमाणे, ही आत्महत्या नाही. नाथ यांची हत्या करून मृतदेह लटकवण्यात आला आहे. घटनेच्या पूर्वी रात्री 1 वाजेच्या सुमारास बाइकवर काही लोक आले होते. त्यांच्यासोबतच देबेंद्र नाथ गेले होते आणि सकाळी त्यांचा मृतदेह सापडला. उल्लेखनीय बाब म्हणजे, देबेंद्र नाथ यांनी 2016 च्या निवडणुकीत एससीसाठी राखीव असलेल्या हेमताबाद येथून माकपच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक जिंकली होती. परंतु, विजयानंतर ते भाजपमध्ये सामिल झाले.

भाजपात येणे हाच नाथ यांचा गुन्हा होता काय? विजयवर्गीय

देबेंद्र नाथ यांच्या हत्येनंतर भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांनीही एक ट्विट केले. त्यामध्ये त्यांची हत्या भाजपमध्ये सामिल झाल्याने करण्यता आली असा आरोप केला. देबेंद्र माकप सोडून भाजपमध्ये आले होते हा त्यांचा गुन्हा होता का? यामुळेच त्यांची हत्या करण्यात आली. असे विजयवर्गीय म्हणाले आहेत.

Advertisement
0