आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
काेलकातामधील मुक्ताराम बाबू स्ट्रीट येथील राम मंदिर चाैकापासून काही अंतरावर समाेर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा पुतळा आहे. त्याच्या मागील तसेच पुढील बाजूच्या दुकानांवर तृणमूलचे ध्वज दिसतात. परंतु येथे आम्हालाही झेंडे लावायचे आहेत. मात्र, तृणमूलचे कार्यकर्ते हे झेंडे काढून फेकतात, अशी भाजपचे समर्थक विक्रम दास तक्रार करतात. नगरसेवक विजय उपाध्याय म्हणाले, आमच्या पक्षाचे झेंडे येथे आधीपासूनच हाेते. वास्तविक पुतळा स्थापन करणे व झेंडे लावण्यावरून भाजपच्याच दाेन गटांत हाणामारी हाेते. आम्ही तर केवळ पक्षाचा प्रचार करत आहाेत. काेलकाता व राज्यात केवळ हे एकच उदाहरण नाही. उलट बहुतांश ठिकाणी तृणमूल व भाजप समर्थक यांच्यात संघर्ष वाढला आहे. एकेका मतासाठी हा संघर्ष वाढताेय. राज्यातील इतर भागांतही हिंसाचार वाढत असल्याचे दिसून येते.
तृणमूल काँग्रेस प्रत्येक बूथवर १० लाेकांची नियुक्ती करत आहे. भाजपने आतापर्यंत ८१ हजारांपैकी ६५ हजार बूथवर किमान एका कार्यकर्त्याची नियुक्त केली आहे. काेलकाताच्या ताेपसिया मार्गावरील तृणमूल भवन व हेस्टिंग्ज येथील भाजपचे प्रचार कार्यालय बंगालच्या राजकारणाचे हाॅट सेंटर बनले आहे. काही दावे किंवा तयारी असली तरीही तृणमूल ममता बॅनर्जी यांच्या चेहऱ्यावर, तर भाजप विनाचेहरा माेदींच्या नावे निवडणूक रिंगणात आहे. या सर्व संघर्षात काँग्रेस, डावे पक्ष मुख्य लढतीत नाहीत. परंतु अटीतटीच्या प्रसंगी निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेच्या वेळी या पक्षांची मदत घेतली जाऊ शकते. उज्ज्वल बंगाल घडवण्याचे स्वप्न प्रत्येक पक्ष मतदारांना दाखवत आहे. दाेन्ही पक्ष साेशल मीडियाचा जाेरदार वापर करत आहेत.
एक वरिष्ठ पत्रकार म्हणाले, २००६ ची स्थिती वेगळी हाेती. तृणमूल वाढेल, बुद्धदेव भट्टाचार्य मुख्यमंत्री हाेतील हे स्पष्ट हाेते. २०११ मध्ये सिंगूर -नंदीग्राम चळवळीमुळे तृणमूलने माेठा विजय मिळवला. आता तसे नाही. सध्या निश्चितपणे काही सांगता येत नाही.
रवींद्र भारती विद्यापीठाचे राज्यशास्त्राचे प्राेफेसर व राजकीय विश्लेषक विश्वनाथ चक्रवर्ती म्हणाले, २०१९ च्या लाेकसभा निवडणुकीत १८ जागांवर रालाेआ जिंकल्यानंतर बिहारमध्ये सरकार स्थापन झाले. त्यामुळे येथील भाजप कार्यकर्त्यांचे मनाेबल वाढले. काँग्रेस, डाव्या पक्षांचा पाठिंबा कमी हाेण्याची चिन्हे आहेत. आगामी काही आठवड्यांत समर्थक आणखी घटू शकतात.
१२५ जागांवर मुस्लिम मतांचा प्रभाव, आेवेसी-सिद्दिकी यांची प्रवेशाची तयारी
पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम मतांचे महत्त्व आहे. सीएसडीएसनुसार राज्यातील सुमारे १२५ विधानसभा जागांवर २० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त मुस्लिम मते आहेत. ४३ जागांवर ५० टक्क्यांहून जास्त मुस्लिम मते आहेत. सर्वाधिक ९७ टक्के मुस्लिमबहुल मतदारसंघ म्हणून डाेमकाल आेळखले जाते. भगबानगाेलामध्ये ८८ टक्के मुस्लिम मतांचा दबदबा आहे. असदुद्दीन आेवेसी यांचा पक्ष व माैलाना अब्बास सिद्दिकी येथे निवडणूक लढण्याची शक्यता आहे. हुगळी जिल्ह्यातील जंगिरामधील फुरफरा दरबार शरीफचे माैलाना आहेत.
तृणमूलमधून येणाऱ्यांचे भाजप करतोय स्वागत, कचरा साफ हाेताेय : तृणमूल
तृणमूल, काँग्रेस, डावे पक्षांतील १०० हून जास्त नेते पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. पक्षाचे राज्य प्रभारी व महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा दाेन वेळा दाैरा केला आहे. विजयवर्गीय म्हणाले, ८१ हजारपैकी ६५ हजार मतदान केंद्रांवर कार्यकर्ते नियुक्त केले आहेत. स्थानिक कार्यकर्ते व नेतेच निवडणुकीचे संचालन करत आहेत, असे त्यांनी सांगितले. क्षेत्रीय पातळीवर बाहेरचे नेते मार्गदर्शन करतील. राज्यातील जनताच नव्हे तर आता त्यांचे नेतेही तृणमूलपासून सुटका करू इच्छितात. आम्ही त्यांचे स्वागत करू.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.