आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पश्चिम बंगाल निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा कुटुंब कोळसा घोटळ्याच्या घेऱ्यात अडकतांना दिसत आहे. रविवारला सीबीआयने ममता बनर्जी यांचा भाचा अभिषेक बनर्जी यांच्या घरी जाऊन पत्नी रुजिरा हीला नोटीस दिली. सीबीआयने रुजिरा यांची बहिण मेनकाला समन्स बजावले असून तीला आज चौकशीसाठी बोलावले आहे.
अभिषेक म्हणतो - आम्ही झुकणारे नाही
अभिषेक यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले की, आज (रविवार) 2 वाजता सीबीआयने माझ्या पत्नीच्या नावाने नोटीस जारी केली. आम्हाला कायद्यावर पूर्ण विश्वास आहे. केंद्र सरकारावर टीका करताना ते म्हणाले की, जर यामाध्यमातून ते आम्हाला घाबरवू पाहत असेल तर ही त्यांची सर्वात मोठी चूक आहे. आम्ही त्यातले नाही, जे वाकले जाऊ शकतात.
नोटीसच्या वेळेवर उठले प्रश्न
निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर टीएमसीने सीबीआयच्या नोटीस वेळेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. टीएमसीने विधानसभा निवडणूकीच्या आधी अशा प्रकारच्या नोटीसाला राजकारण म्हटले होते. केंद्र सरकारवर ममता बनर्जी यांनी यापूर्वीही सरकारी यंत्रणांचा दुरपयोग केल्याचे आरोप केले होते. परंतु, दुसरीकडे भाजपाने सांगितले की, हे प्रकरण खुप दिवसांपासून चालू असून सीबीआयने या प्रकरणात चौकशी करण्याची ही पहिली वेळ नाही.
शुक्रवारी 13 ठिकाणावर छापे टाकले
संबंधित प्रकरणात सीबीआयने शुक्रवारी राज्याच्या पुरुलिया, बांकुरा, बर्दवान आणि कोलकतातील 13 स्थळांवर छापे टाकले. ही छापेमारी युवा तृणमूल काँग्रेंसचे नेते विनय मिश्रा, व्यापारी अमित सिंह आणि नीरज सिंह यांच्या ठिकाणी टाकण्यात आली होती. छापेमारी दरम्यान घरात कोणी उपस्थित नसून 11 जानेवारीला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) हुगळी, कोलकता, उत्तर 24 परगना, आसनसोल, दुर्गापूर, वर्धमान येथे छापे टाकले होते.
टीएमसी नेत्यावर होत आहे आरोप
कोळसा घोटाळा प्रकरणी टीएमसी नेत्यावर आरोप होत असून यात अभिषेक बॅनर्जीच्या नावाचा देखील समावेश आहे. आरोप आहेत की, बंगालमध्ये कित्येक हजार कोटी कोळशाचे अवैधरित्या उत्खनन झाले असून रॅकेटच्या माध्यमातून ते काळ्या बाजारात विकण्यात आले. संबंधित प्रकरणामध्ये सीबीआयने डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कोलकताचे सीए गणेश बगारियाच्या कार्यालयावर देखील छापे टाकले होते.
सप्टेंबरमध्ये चौकशी सुरू; कोर्टाने सीबीआयला मंजुरी दिली
गेल्या वर्षी सप्टेंबर महिण्यात कोळसा घोटाळ्याची चौकशी सुरू झाली होती, तेव्हांपासून भाजप सतत याप्रकरणी टीएमसीवर आरोप करत आहे. भाजप नेत्याचे सांगणे आहे की, टीएमसी नेत्यांनी कोळसा घोटळ्यातील काळा पैसा शेल कंपन्यांच्या माध्यमातून पांढऱ्या पैशामध्ये रुपांतरित केला. यात सर्वात जास्त फायदा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पुतण्या अभिषेक बॅनर्जी याला झाला.
अभिषेक बनर्जी टीएमसीच्या युवा आघाडीचे अध्यक्ष असून त्यांनी आपल्या पक्षात विनय मिश्रा यांच्यासह 15 तरुणांना सरचिटनीस बनवले होते. कोळशा घोटळ्याप्रकरणी विनय मिश्रा यांच्यावर आधीपासूनच आरोप आहेत. टीएमसीने सीबीआय चौकशी थांबवण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु, हायकोर्टाने ती फेटाळली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.