आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:20 रुपयांच्या नोटेमुळे 20 हजार कोटींचा घोटाळा उघड, झारखंड ते बंगालपर्यंत घोटाळ्याची व्याप्ती; ममतांच्या ‘घरा’पर्यंत असे पोहोचले सीबीआय पथक

धनबाद (विकास सिंह)14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बंगालमधून १०० ट्रक कोळसा अवैधपणेे झारखंड, यूपीसह देशभरात पाठवला जात होता

२० हजार कोटींचा कोळसा घोटाळा. दोन राज्यांचे (झारखंड व पश्चिम बंगाल) सिंडिकेट. चौकशीची व्याप्ती वाढली तेव्हा अवैध कोळशाचे डाग प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कुटुंबावरही पडले. चौकशीत दीदींचे कुटुंब अडकत आहे. हे सिंडिकेट चालवणाऱ्या अनुप मांझी ऊर्फ लालाला सीबीआय शोधत आहे. लालाला भ्रष्ट अधिकारी व नेत्यांच्या सिंडिकेटने अवैध तस्करीचा म्होरक्या बनवले. त्याच्या माध्यमातून संपत्ती जमवली, हे चौकशीतून पुढे येत आहे. या घोटाळ्यातील अवैध कोळसा देशातील विविध भागांत विकला गेला. लाला सिंडिकेटचे ७ ट्रक धनबादमध्ये पकडण्यात आल्यानंतर हा घोटाळा समोर आला. या ट्रकच्या चौकशीत २० हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे रहस्य उलगडले.

पासिंग कोड होती २० ची नोट : बनावट इनव्हाॅइस बिलात २० ची नोट चिकटवली जात होती. ही नोटच ट्रकची पासिंग कोड होती. सीबीआयच्या हाती लागलेल्या पॅडमध्येही २० ची नोट चिकटवलेली होती. नोटेच्या मालिका क्रमांकाचा उल्लेख संबंधित कोळसा पुरवठा कंपनीच्या जीएसटी क्रमांकाच्या जागी अंकित होता. संबंधित ट्रक लाला सिंडिकेटचा आहे आणि पोलिस त्याला सुरक्षित मार्ग देतील, याची हमी ही नोट होती.

३ पद्धती | बंद खाणीत खनन... देशभरात असा पोहोचत होता चोरीचा कोळसा
1. खाणी बंद करत होते

सीबीआयला चौकशीत आढळले की, कोळशाचे अवैध खनन करण्यासाठी काही ईसीएल अधिकारी चालू खाण बंद करून टाकत होते. मुख्य आरोपी लाला यास बंद खाणींतून कोळसा काढता यावा हा त्यामागील हेतू होता.
2. बनावट पॅडवर प्रवेश
लाला आणि सिंडिकेट बंगालमधून सरासरी १०० ट्रक झारखंड वा बिहार व यूपीसह देशभरात पाठवत होते. या ट्रकमध्ये कोळशाच्या खरेदी-विक्रीसाठी वैध दस्तावेज आणि नोंदणीकृत कोळसा कंपनीच्या चालानऐवजी बनावट पॅडचा वापर होत होता.
3. जीएसटी हडपत होते
जीएसटीची रक्कम हडपली जात होती. उदा. एका ट्रकमध्ये सुमारे २६ टन कोळसा आहे, त्याचे बाजार मूल्य १.९२ लाख रु. आहे. झारखंडच्या ट्रकच्या एंट्रीवर जीएसटी म्हणून ५% रक्कम द्यावी लागते. बनावट पॅडचा वापर करून राज्य सरकारला फसवत होते.

घोटाळ्यातील मोठी पात्रं : लाला: सीबीआयच्या मते, लालाला राजकीय आश्रय आहे. तो बंगालच्या मोठ्या राजकीय पक्षाला निधी देतो. {विनय मिश्रा: त्यानंतर टीएमसी युवा काँग्रेसचे सरचिटणीस विनय घेऱ्यात आले. डिसेंबर २०२० मध्ये विनय यांच्या घरी छापे पडले. {रुजिरा: विनय यांच्या घरांवरील छाप्यानंतर अभिषेक यांची पत्नी रुजिरावर संशय आला.

बातम्या आणखी आहेत...