आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • West Bengal Coal Scam News And Updates; Update | CBI Raids Kolkata Including 13 Locations, Mamata Banerjee TMC Party Leaders

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बंगाल निवडणुकीपूर्वी CBI अॅक्शन मोडमध्ये:कोळसा घोटाळा प्रकरणात 13 ठिकाणांवर छापेमारी; तृणमूल नेत्यांवर घोटाळ्याचे आरोप

कोलकाता6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सप्टेंबरमध्ये तपास सुरू झाला; कोर्टाने CBI ला मंजुरी दिली

पश्चिम बंगालमध्ये लवकरच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सेंट्रल इंवेस्टिगेशन ब्यूरो (CBI) अॅक्शन मोडमध्ये आले आहे. शुक्रवारी CBI ने कोळसा घोटाळा प्रकरणात बंगालच्या पुरुलिया, बांकुरा, बर्दवान आणि कोलकातामध्ये 13 ठिकाणांवर छापेमारी केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही छापेमारी युवा तृणमूल काँग्रेस नेते विनय मिश्रा, व्यवसायी अमित सिंह आणि नीरज सिंहच्या ठिकाणांवर झाली. छापेमारीदरम्यान कुणीच घरी उपस्थित नव्हते. यापूर्वी अंमलबजावनी संचालनालयाने 11 जानेवारीला हुगली, कोलकाता, उत्तर 24 परगना, आसनसोल, दुर्गापूर, बर्धमानमध्ये छापेमारी केली होती.

तृणमूल नेत्यांवर आरोप

कोळसा घोटाळा प्रकरणात TMC नेत्यांवर आरोप आहेत. यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जीचे भाच्चे अभिषेक बॅनर्जी यांचेही नाव आहे. आरोप आहे की, बंगालमध्ये अवैधरित्या हजारो कोटी रुपयांच्या कोळशाचा उपसा झाला आणि एका रॅकेटमधून याला ब्लॅक मार्केटमध्ये विकण्यात आले. याप्रकरणी डिसेंबर 2020 मध्ये CBI ने कोलकातातील CA गणेश बगारियाच्या ऑफीसवर छापेमारी केली होती.

सप्टेंबरमध्ये तपास सुरू झाला; कोर्टाने CBI ला मंजुरी दिली

मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये कोळसा घोटाळ्याचा तपास सुरू झाला होता. तेव्हापासून BJP याप्रकरणी TMC वर आरोप लावत आहे. BJP नेत्यांचे म्हणणे आहे की, कोळसा घोटाळ्यातून मिळालेल्या काळ्या पैशांना TMC नेत्यांनी शेल कंपन्यांद्वारे व्हाइट मनी करुन घेतले. यात सर्वाधिक फायदा मुख्यमंत्री ममता बॅनर्जीचे भाच्चे अभिषेक बॅनर्जींना झाला. अभिषेक बॅनर्जी TMC च्या युवा विंगचे अध्यक्ष आहेत. त्यांनी आपल्या पक्षात विनय मिश्रासह 15 जणांना महासचिव बनवले होते. विनय मिश्रा आधीपासूनच कोळसा घोटाळ्यातील आरोपी आहे.