आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • West Bengal Election 2021: A Logo Of 'No Refuse' On Every Taxi In West Bengal; Ne3ws And Live Updates

दिव्य मराठी विशेष​​​​​​​:पश्चिम बंगालच्या प्रत्येक टॅक्सीवर ‘नो रिफ्युजल’!; निवडणूक संघर्षातून भविष्यातील हिंसाचाराची पार्श्वभूमी, विधासभेच्या रणांगणातही हे चित्र

कोलकताएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तरुणांसाठी निवडणूक मोठी संधी...त्यांच्या रक्तात ‘नो रिफ्युजल’

बंगालमध्ये अराजक, हिंसक हात सवलतीनुसार उपलब्ध हाेतात. कारखाने बंद झाल्याने बेराेजगारी वाढली आणि शेती आतबट्ट्याची ठरली. त्यामुळे तरुणांसमाेर राेजगाराचा एकच मार्ग आहे. पक्षाला विजय मिळवून देणे आणि गावात सरकारी ठेका घेणे. ‘ताेलाबाजी’ म्हटली जातेय ती हीच आहे. ममतांनी तरुणांची अजब साखळी बनवली आहे. सर्व क्लबला सरकारी मदत मिळते. जनतेला याच साखळीतून प्रत्येक गाेष्टीची परवानगीसाठी जावे लागते. १६ ऑगस्ट १९९० ला सत्ताधारी कॉम्रेड हल्ल्यातून बचावलेल्या ममता बॅनर्जी यांनी २०११ मध्ये राज्याची सूत्रे हाती घेतली. टॅक्सींवर ‘नो रिफ्युजल’ लिहायला लावले. कोलकात्यामध्ये जवळपास सर्वच टॅक्सींवर हे शब्द दिसतात. म्हणजेच ‘सांगितले तेवढे करा, नकारघंटा नको’. ही बाब तशी प्रवाशांच्या सोयीची आहे.

परंतु ममता सरकार व त्यांच्या पक्षाची मिरास काय अाहे, हेसुद्धा यातून दिसून येते. म्हणजे नकारघंटा ऐकणे सरकारला पसंत नाही. निवडणुकीचे वारे वाहत असताना मात्र नेत्यांचे बोलदेखील गोळीबार-बाॅम्बपेक्षा कमी वाटत नाहीत. ते सर्रास प्रक्षोभक बोलू लागले आहेत. धमकावू लागलेत. ऑगस्ट १९९० मध्ये डाव्यांनी ममतांना नकार दिल्यावरून ‘शिक्षा’ दिली होती. तेव्हा ममतांच्या डोक्याला १६ टाके लागले होते. म्हणजेच सत्ता हाती आलेल्या प्रत्येक पक्षाने एकाधिकारशाही गाजवलेली आहे. त्यातून बंगालचा कारभार हाकला. हिंसाचाराला राजकीय संस्कृतीचा भाग बनवले. आताही एकाधिकारशाही वृत्तीचे गट समाेरासमोर येत असल्याने यंदा हिंसाचाराचा नवा विक्रम होईल की काय, असा प्रश्न पडतोय. २०१८ च्या पंचायत निवडणुकीच्या आधी सातत्याने हिंसाचार झाला. तो वाढला. सरकार आमचेच बनणार असल्याचे ममता सांगतात.

निवडणुकीनंतर केंद्रीय सुरक्षा दलास जाऊ तर द्या. नंतर पाहून घेते, याचा अर्थ तरी काय होतो? त्याचे भयंकर अर्थ समजू शकतात. वास्तविक ममता नवीन काही सांगत नाहीत. बंगालमध्ये सत्तेवर आलेला पक्ष आपलेच म्हणणे खरे करतो. त्यांचे म्हणणे न ऐकणाऱ्यांना कशी वागणूक दिली जाते हे सर्वांना ठाऊक आहे. बंगालमध्ये प्रत्येक पक्षाच्या काळात हिंसाचार घडून आला आहे. गरिबांचा कळवळा असल्याचा दावा करणाऱ्या डाव्यांच्या कार्यकाळात सिंगूर, नंदीग्रामसारख्या घटनांत अनेक लोकांचा मृत्यू झाला. महिलांवर अत्याचार झाले होते. त्यामागे एकछत्री राज्य कायम ठेवण्याचे मनसुबे स्पष्ट होते. ममतांना संधी मिळाली तेव्हा त्यांनी डाव्या प्रतीकांना अडगळीत टाकले. त्यांच्या लाल रंगावर आपला निळसर रंग फासला. सर्व सरकारी इमारती, शाळा, पूल, रुग्णालये.. एवढेच नव्हे तर रस्त्यांची दुभाजके निळ्या रंगात रंगून गेली. आता भाजप बंगालला भगव्या रंगात रंगवण्यासाठी कवायत करत आहे. १९७७ ते २००७ पर्यंत बंगालमध्ये राजकीय हिंसाचारात २८ हजार लोकांचा मृत्यू झाला, असे कागदपत्रांतून स्पष्ट होते.

बातम्या आणखी आहेत...