आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • West Bengal Election 2021 In The Sixth Phase, There Is A Possibility Of Violence BJP MPs And Trinamool MLAs

पश्चिम बंगाल विधानसभा 2021:सहाव्या टप्प्यात बहुतांश जागांवर भाजपचे खासदार, तृणमूलचे आमदार असल्याने हिंसाचाराची शक्यता

काेलकाता9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम बंगाल निवडणुकीचा शेवटचा टप्पा शांततेत गेला. चाैथ्या टप्प्यात कूचबिहारमध्ये हिंसाचार पुन्हा वाढू शकताे असा अंदाज लावला जात हाेता. निवडणूक आयाेग २२ एप्रिलला सहाव्या टप्प्याच्या दृष्टीने सतर्कता बाळगत आहे. आतापर्यंत हिंसाचारात बहुतांश तृणमूल व भाजप कार्यकर्ते आमने-सामने आले. सहाव्या टप्प्यात ४ जिल्ह्यांतील ४३ जागांवर मतदान हाेणार आहे. या जिल्ह्यांतील बहुतांश लाेकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार व तृणमूलचे आमदार यांच्यात संघर्ष हाेऊ शकताे. २२ तारखेस उत्तर दिनाजपूरच्या सर्व ९ जागी, नदियाच्या १७ पैकी ९, उत्तर-२४ परगणाच्या ३३ पैकी १७, बर्धमानच्या २४ पैकी ८ जागांवर मतदान हाेणार आहे.

उत्तर दिनाजपूरमध्ये लाेकसभेच्या तीन जागा आहेत. दार्जिलिंग, रायगंज, बालूरघाट आहे. तीनही ठिकाणी भाजपचे खासदार आहेत. नऊ पैकी सहा मतदारसंघांत तृणमूल, प्रत्येकी एका जागेवर माकप, फाॅरवर्ड ब्लाॅक, काँग्रेसचे आमदार आहेत. नदियाच्या दाेन लाेकसभा मतदारसंघांतील एकावर भाजप व एकावर तृणमूलचे खासदार आहेत. १७ विधानसभा जागांवर तृणमूलचे १३, काँग्रेस-२, भाजप व डावे यांचे प्रत्येकी एक आमदार आहे. उत्तर २४ परगणाच्या दाेन लाेकसभा जागांवर प्रत्येकी एका जागेवर तृणमूल व भाजप आहे. १२ जागांपैकी ९ वर तृणमूल व २ वर माकप व एकावर भाजप आहे. पूर्व बर्धमानमधून तृणमूलचे खासदार आहेत.

निवडणूक संपेपर्यंत रक्तपात वाढीची भीती
राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार निवडणूक संपेपर्यंत राज्यातील काही भागांत पुन्हा हिंसाचार व रक्तपात वाढू शकताे. आतापर्यंत हिंसाचारात तृणमूल व भाजप समर्थक आमने-सामने राहिले. दाेन्ही पक्ष सत्तेसाठी काहीही करण्यास तयार आहेत, हे दिसते. राज्यात निवडणुकीदरम्यान राजकीय हिंसाचार ही काही नवी बाब नाही. डाव्या सरकारच्या काळात राजकीय हिंसाचार हाेत असे.

बातम्या आणखी आहेत...