आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • West Bengal Election | Centre VS Mamata Banerjee, One More TMC MLA Resigns From The Party

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ममता बॅनर्जी अडचणीत:तृणमूलच्या आणखी एका आमदाराने पक्षाला ठोकला रामराम; केंद्राने बंगालच्या दोन अधिकाऱ्यांना संध्याकाळपर्यंत दिल्लीत बोलावले

कोलकाताएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बैठक बोलावली

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांच्या अडचणी वाढत आहेत. एकीकडे भाजप त्यांना घेराव घालत आहेत तर दुसरीकडे जवळचेसोबती त्यांची साथ सोडत आहेत. शुक्रवारी पक्षाचे आणखी एक आमदार शिलाभद्र दत्ता यांनी पक्ष सोडला. शुभेंद्र अधिकारी आणि जितेंद्र तिवारी यांच्यानंतर पक्ष सोडणारे दत्ता तिसरे आमदार आहेत. अधिकारी यांनी विधानसभेचाही राजीनामा दिल होता. तिघांनीही गेल्या तीन दिवसात ममता यांना सोडले.

दुसरीकडे, आज केंद्र सरकारने बंगालचे मुख्य सचिव आणि पोलिस प्रमुख यांना समन्स बजावले आहे. सायंकाळी 5.30 पर्यंत त्यांना दिल्लीत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी केंद्रीय गृह सचिवांनी गुरुवारी संध्याकाळी बंगाल सरकारला पत्र लिहिले होते. त्यास प्रत्युत्तर म्हणून राज्य सरकारने कोरोनामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीचा सल्ला दिला आहे.

BJP राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या काफिल्यावरील हल्ल्यानंतर केंद्राने गेल्या आठवड्यात दोन्ही अधिकाऱ्यांना बोलावले होते. त्यानंतर राज्य सरकारने अधिकाऱ्यांना पाठवण्यास नकार दिला होता.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बैठक बोलावली
ममता बॅनर्जी यांनी आज बैठक बोलावली असून सलग तीन आमदार निघून गेल्यामुळे त्या चिंतेत आहेत. मात्र, पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही इमरजेंसी नाही, तर रेग्युलर मीटिंग आहे. प्रत्येक शुक्रवारी पार्टी चेअरपर्सन नेत्यांना भेटतात.

गृहमंत्री अमित शाह उद्यापासून बंगाल दौऱ्यावर
गृहमंत्री अमित शहा यांच्या बंगाल दौर्‍याच्या एक दिवस आधी ममतांनी पक्षाची बैठक बोलावली आहे. शाह 19 आणि 20 डिसेंबरला बंगालमध्ये असतील. येथे ते एक रॅली घेतील. असे सांगितले जात आहे की यावेळी ते मंदिरात जाऊन दर्शन घेतली आणि रोड शो करतील. अमित शहा यांच्या मिदनापुरात मुक्काम असताना टीएमसीचे बंडखोर शुभेंदू अधिकारी यांना भाजपमध्ये सामील केले जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser