आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकारण चांगलेच तापले आहे. राज्यात यापूर्वी भाजपच्या रॅलीवर तृणमूलच्या समर्थकांकडून हल्ला करण्यात आला होता. त्यात भाजपचे बंगाल प्रभारी कैलास विजयवर्गीय जखमी झाले होते. यानंतर आज(दि.18) परत एकदा भाजपच्या रोड शोवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. या रोड शोमध्ये केंद्रीय मंत्री देबाश्री चौधरी, भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष आणि TMC मधून भाजपात आलेले शुभेंदु अधिकारी सामील होते.
#WATCH | West Bengal: Stones were pelted at BJP workers who were part of a rally attended by Union Minister Debasree Chaudhuri, state BJP chief Dilip Ghosh and Suvendu Adhikari in Kolkata earlier today. pic.twitter.com/hLW8NEmWeX
— ANI (@ANI) January 18, 2021
भाजप नेत्यांनी या हल्ल्यामागे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याचे म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दगडफेकदरम्यान दोन्ही पक्षांचे अनेक कार्यकर्ते एकमेकांसोबत भिडले होते. यापूर्वी, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. या मतदारसंघातून 2016 मध्ये त्यांचे अंत्यत जवळचे मानले जाणारे शुभेंदु अधिकारी निवडून आले होते.
पूर्व मिदनापूरमधील नंदीग्राम शुभेंदु अधिकारी यांचा बालेकिल्ला आहे. या ठिकाणी जनतेला संबोधित करताना ममता म्हणाल्या होत्यी की, पक्ष बदलल्याने काही फरक पडत नाही. जेव्हा तृणमूलची सुरुवात झाली होती, तेव्हा हे आमच्या सोबत नव्हते. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम आणि भवानीपुर, दोन्ही ठिकाणावरुन निवडणूक लढवणार.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.