आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात विधानसभेची निवडणूक संपताच राजकीय हिंसाचाराची मालिका सुरू झाली आहे. दरम्यान, निकालाच्या दिवशीच कोलकातामधील भाजपा कार्यालयाला आग लावण्यात आली होती. तर सोमवारी पक्षाच्या दोन कार्यकर्त्यांना मारहाण करत हत्या केल्याची बातमी समोर आली होती. याच पार्श्वभूमीवर पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघाचे खासदार परवेश साहिब यांनी वादग्रस्त विधान केले आहे. ते धमकी देत म्हणाले की, लक्षात ठेवा टीएमसीच्या नेत्यांना आणि खुद्द मुख्यमंत्र्यांनादेखील दिल्लीत यावे लागते.
दरम्यान, ते म्हणाले की, तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी निवडणूक जिंकल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांची हत्या केली. तसेच त्यांनी गाडीची तोडफोड करत अनेक घरांना आगी लावल्या. निवडणुकीत विजय आणि पराभव होत असतो पण हत्या नाही. त्यामुळे हे लक्षात ठेवा की, तुमच्या नेत्यांना आणि मुख्यमंत्र्यांनाही दिल्लीत यावे लागते अशी धमकी ही त्यांनी यावेळी दिली.
भाजप खासदार अनिल बलूनी यांचा तृणमूलवर हल्लाबोल
उत्तराखंडचे भाजप खासदार अनिल बलूनी यांनीही काल झालेल्या घटनेवर तृणमूलवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा एक व्हिडिओही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला असनू त्यात त्यांनी लिहिले की, 'बंगालमधील हिंसाचारांची ही पटकथा यापूर्वीच लिहिलेली गेलेली होती. खुद्द ममता बॅनर्जी यांनी सेंट्रल फोर्स गेल्यावर तुम्हाला कोण वाचवणार असे म्हटले होते.' म्हणजेच बंगालमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराचा खेळ टीएमसीने आधीच सेट केला होती. लज्जास्पद! असे लिहीत त्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन शेअर केले.
भाजप कार्यालयावर हल्ला
उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील भाटपाडा येथे काही लोकांकडून भाजपच्या कार्यालयात आणि काही दुकानांवर हल्ला करत तोडफोड केली आहे. दरम्यान, एका व्यक्तीने सांगितले की, यावेळी बॉम्बही टाकण्यात आले असून टीएमसीच्या बदमाश्यांनी माझे दुकान लुटले आहे. येथे किमान 10 बॉम्ब टाकण्यात आले असल्याचे ही त्यांनी सांगितले. कूचबिहारमधील सीतलकुचीतून ही हिंसाचाराची घटना समोर येत आहे. तर दुसरीकडे, नंदीग्राममध्ये भाजपा कार्यालयाची तोडफोड करण्यात आली असून हळदियात रविवारी सायंकाळी काही बदमाशांनी माध्यमांना प्रतिनिधींना मारहाण केली आहे.
राज्यपालांनी पोलिस अधिकर्यांकडून जाब विचारला
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल जगदीप धनकर यांनी राज्यातील जाळपोळ, लूटमार आणि हिंसाचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता सोमवारी पोलिस महासंचालक (डीजीपी) आणि कोलकाता पोलिस आयुक्तांना कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी बोलावले आहे. राज्यात निकालानंतर होत असलेल्या हत्या धोकादायक परिस्थितीचे लक्षण असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, पोलिस अधिकार्यांना कायद्याचे राज्य पुनर्संचयित करण्यासाठी सर्व पावले उचलण्याचे आदेश राज्यपालांनी दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.