आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • West Bengal Election Result 2021 Mamata Banerjee Assam Kerala Tamil Nadu Puducherry Chunav Parinam TMC BJP Congress

मो'दी'...मो'दी'...:भाजपचे वंग-भंग; ममता स्वत: पराभूत, तृणमूल विजयी; डावे पक्ष, काँग्रेसला प्रथमच अक्षरश: भाेपळा

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बंगालमध्ये 3 वरून 76 जागांवर पोहोचला भाजप, ममतांचीही कामगिरी सुधारली. तृणमूलला सर्वाधिक 48 टक्के मते
  • आसाममध्ये भाजपची सत्ता कायम, पुद्दुचेरीत रंगा काँग्रेसच्या साथीने रालोआने गाठला बहुमताचा आकडा
  • तामिळनाडूत भाजपला प्रथमच 4 जागा, पण एनडीए पराभूत; केरळात एलडीएफ पुन्हा सत्तेवर, भाजपने एकमेव जागा गमावली

रविवारी ५ राज्यांचे निकाल जाहीर झाले, परंतु संपूर्ण देशाचे लक्ष फक्त पश्चिम बंगालमधील चुरशीच्या लढाईवर होते. अपेक्षेप्रमाणे बंगालमध्ये निकालामध्येही ‘खेला’ झाला. राज्याच्या एकूण २९२ जागांपैकी तृणमूल काँग्रेसने प्रचंड बहुमत मिळवून २१४ जागा जिंकल्या, तर राज्यात पहिले भगवे सरकार स्थापन करण्याचा दावा करणाऱ्या भाजपला ७६ जागांवर समाधान मानावे लागले. पण नंदीग्राम मतदारसंघातून स्वत: ममता बॅनर्जी पराभूत झाल्याने नाट्यमय कलाटणी मिळाली. एकेकाळचे तृणमूलचे सेनापती व भाजप उमेदवार शुभेंदू अधिकारी यांनीच ममतांना १९५६ मतांनी पराभूत केले. तथापि निकालामध्ये रात्री उशिरापर्यंत आघाडी-पिछाडी सुरू होती. अखेर रात्री ११.३० वाजता ममतांच्या पराभवाची अधिकृत घोषणा झाली. तत्पूर्वी, सायंकाळी ६ वाजता प्रसारमाध्यमांशी बोलताना ममता यांनी पराभव स्वीकारला असे सांगून निकालाविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले होते. ममता सोमवारी राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा करणार आहे. इकडे, सन २०१६ च्या ३ जागांच्या तुलनेत भाजपची कामगिरी खूप सुधारली आहे. परंतु पक्ष सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरीची पुनरावृत्ती करू शकला नाही. त्या वेळी १२१ जागांवर आघाडी मिळाली होती. निकालानंतर राज्यात काही ठिकाणी हिंसाचार उफाळला.

६ मुद्द्यांद्वारे समजून घेऊ बंगालचे निकाल

1. मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण तर झाले, पण ते तृणमूल काँग्रेसच्या बाजूने गेले
मालदा, मुर्शिदाबाद, उत्तर व दक्षिण दिनाजपूर या मुस्लिमबहुल जिल्ह्यांत ४९ जागा आहेत, त्यापैकी ३६ तृणमूलच्या खात्यात गेल्या. त्यावरून मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण तर झाले, पण ते तृणमूलच्या बाजूने गेले हे स्पष्ट होते.
2. शहरी मतदारही भाजपसोबत नाही, कोलकात्यात एकही जागा नाही

कोलकात्यासह शहरी भागांत भाजपला एकही जागा मिळाली नाही. फक्त दार्जिलिंग, कूचबिहार, जलपायगुडीत यश मिळाले. शहरी मतदार भाजपपासून दूरच राहिला.

3. स्ट्राइक रेटमध्ये ममतांची कामगिरी भाजपच्या केंद्रीय नेत्यांपेक्षा चांगली
ममतांनी १०० पेक्षा जास्त सभा घेतल्या, तर पंतप्रधान मोदींनी २० व केंद्रीय मंत्र्यांनी ५० पेक्षा जास्त सभा घेतल्या. जिंकलेल्या जागा पाहता ममतांच्या सभा जास्त यशस्वी ठरल्या.

4. बाबुल सुप्रियो आणि ममतांचे माजी मंत्री राजीव बॅनर्जी पराभूत, मुकुल रॉय जिंकले
केंद्रात राज्यमंत्रिपद सोडून निवडणुकीत उतरलेले बाबुल सुप्रियो टॉलीगंजमधून पराभूत. ममता सरकारमध्ये मंत्री राहिलेले राजीव बॅनर्जी भाजपकडून पराभूत. खासदार मुकुल रॉय हेच जिंकले.
5. राज्यसभेतही भाजपला फायदा नाही
राज्यसभा निवडणूक २०२३ च्या आधी नाही भाजपला राज्यसभेत बहुमतासाठी १२ खासदार हवे. बंगालमध्ये ७६ जागा मिळाल्या. येथे राज्यसभा निवडणूक २०२३ मध्ये. तामिळनाडूतून ५ नवे सदस्य २०२२ मध्ये यूपीएला मिळतील.

6. डावे पक्ष-काँग्रेसचा धुव्वा, चांगले लढले असते तर तृणमूलचे नुकसान झाले असतेबंगालच्या इतिहासात प्रथमच राज्यात डावे पक्ष आणि काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. डावे+काँग्रेस भक्कमपणे लढले असते तर तृणमूलला नुकसान झाले असते.

निकाल लागताच पायांवर उभ्या

व्हीलचेअर सुटली : संपूर्ण निवडणूक प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी यांची ओळख ठरलेली व्हीलचेअर रविवारी निकाल लागताच सुटली. माध्यमांशी बोलण्यासाठी ममता चक्क सहजपणे चालत आल्या. पायऱ्याही कुणाच्या आधाराविना चढल्या, उतरल्या.

तामिळनाडूत स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली द्रमुक आणि सहकारी पक्षांनी १५६ जागा जिंकल्या. यातील १३३ द्रमुकच्या आहेत. बहुमतासाठी ११८ जागा हव्या आहेत. म्हणजे, सहकारी पक्षांचा द्रमुकवर दबाव राहणार नाही. दुसरीकडे, आपसांतील संघर्षामुळे अण्णाद्रमुक ७८ जागांवरच आटोपला. राज्यात नवे राजकीय समीकरण मांडण्याच्या तयारीत असलेले कमल हासन यांना भाजपच्या वानती श्रीनिवासन यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. भाजपच्या महिला आघाडीच्या त्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.

डाव्या पक्षांचे प्रमुख पी. विजयन केरळमध्ये सत्ता वाचवण्यात यशस्वी ठरले. राज्यात ५० वर्षांनंतर प्रथमच एलडीएफ सलग दुसऱ्यांदा सरकार स्थापन करेल. वास्तविक केरळमध्ये दर पाच वर्षांनी सत्तापरिवर्तन होते. या वेळी कोरोना लढाईतील भूमिका या पक्षासाठी गेमचेंजर ठरली. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यूडीएफला नव्याने उभारी देण्यासाठी राहुल गांधी केरळमध्ये प्रचंड वेळ दिला. मात्र, विजयन यांनी या भागांत सभा वाढवून काँग्रेसला अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत घेरले.

५ राज्यांत भाजपसाठी सर्वात दिलासा आसाममध्ये मिळाला. येथे सर्वानंद सोनोवाल यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने ७४ जागा जिंकून सत्ता कायम राखली. आसाममध्ये या वेळी मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू झाली आहे. आसाम सरकारचे शक्तिशाली मंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, सीएमचा निर्णय केंद्रीय नेतृत्व घेईल. अर्थात, केंद्रीय नेतृत्वाने याबद्दल अद्याप काहीही सांगितलेले नाही. मात्र, सरमा यांचा दावा सहजपणे घेता येणार नाही. कारण आसाममधील भाजप संघटनेचा सरमा हे कणा मानले जातात.

बातम्या आणखी आहेत...