आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • West Bengal Election Result Counting 2020 LIVE Update Mamata Banerjee Assam Kerala Tamil Nadu Puducherry Chunav Parinam TMC BJP Congress Latest News Nandigram Suvendu Adhikari Narendra Modi Amit Shah

5 राज्यांचा निकाल:नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींच्या विजयावर सस्पेंस; आधी विजयाची घोषणा झाली, पण निवडणूक आयोगानुसार त्या 4099 मतांनी आघाडीवर

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बंगालमध्ये 1.5 टक्के मतदान कमी झाले, ही तृणमूलसाठी चिंताजनक बाब आहे

कोरोना महामारीदरम्यान 62 दिवस चाललेल्या निवडणुकीनंतर बंगाल, असम, तमिळनाडू, केरळ आणि पुडुचेरीचे निकाल समोर येत आहेत. तीन राज्य बंगाल, केरळ आणि असममध्ये सत्ता परिवर्तन होताना दिसत नाही. म्हणजेच, बंगालमध्ये तृणमूल, केरळमध्ये LDF आणि असममध्ये भाजपला सत्ता राखण्यात यश आले आहे. तर, तमिळनाडुमध्ये बदल होताना दिसत आहे. तिथे द्रमुक सत्ता स्थापन करणार असल्याचे जवळ-जवळ निश्चित आहे.

नंदीग्रामवर सस्पेंस कायम

तिकडे, राज्यातील सर्वात प्रतिष्ठेच्या नंदीग्राम मतदारसंघाच्या निकालांवर सस्पेंस कायम आहे. आधी बातमी आली होती की, ममता बॅनर्जी यांनी शुभेंदू अधिकारींचा 1200 मतांनी पराभव केला आहे. परंतु, भाजपचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी दावा केला आहे की, ममता बॅनर्जी यांचा 1,953 मतांनी पराभव झाला आहे. दरम्यान, रात्री 10.30 वाजेपर्यंत निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, ममता अधिकारी यांच्यापासून 4099 मतांनी आघाडीवर आहेत.

ममतांची पत्रकार परिषद

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर रविवारी सायंकाळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या व्हीलचेयरशिवाय दिसल्या. त्यांना 10 मार्चला प्रचारादरम्यान दुखापत झाली होती. यानंतर मागील 53 दिवसांपासून त्या प्लास्टरमध्ये प्रचार करत होत्य. आता अचानक त्यांना ठीक झालेलं पाहून भाजपने हे सर्व नाटक असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, या निकालानंतर कोलकातामधील भाजप कार्यालयात आग लावण्यात आली आहे, यामागे तृणमूलचा हात असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

ममता आणि शुंभेदू अधिकारी यांच्या निकालावर अद्याप सस्पेंस कायम आहे. पण, ममता यांच्या विधानावरुन त्यांचा पराभव झाल्याचे दिसत आहे. पत्रकार परिषदेदरम्यान ममता म्हणाल्या की, नंदीग्रामबाबत जास्त ताण घेऊ नका.मी नंदीग्रामसाठी संघर्ष केलाय. नंदीग्रामच्या लोकांनी जो कौल दिलाय, तो मला मान्य आहे.

1. बंगाल
एकूण जागा : 294 (मतदान 292 जागांवर झाले)
बहुमत : 148(292 जागांच्या हिशोबाने 147)
गेल्या वेळी कोण जिंकले : तृणमूल काँग्रेस

मतमोजणीची आकडेवारी

पक्षआघाडीविजयीएकूण
तृणमूल +2070207 (-5)

भाजप+

82082 (+79)
काँग्रेस202 (-74)
इतर101 (0)

राज्यांमध्ये 294 मधून 292 जागांवर मतदान झाले आहे. भाजपने येथे पहिल्यांदा 291 जागांवर उमेदवार उतरवले, तर एका जागा त्यांनी सुदेश महतो यांच्या ऑल झारखंड स्टूडेंट्स यूनियन पार्टीला दिल्या. पहिल्यांदा येथे गोरखा जनमुक्ति मोर्चाने भाजपसोबत निवडणूक लढवली होती. यावेळी GJM तृणमूलसोबत आहे. निवडणुकांपूर्वी भाजपने तृणमूल काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांना आपल्या जाळ्यात ओढले. यामध्ये ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय शुभेंदु अधिकारी यांचाही समावेश आहे.

29 एप्रिलला झालेल्या एक्झिट पोलमध्ये बंगालबद्दल कोणतेही एक मत दिसले नाही. 9 पैकी 5 एक्झिट पोलमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूलला बहुमत मिळत असल्याचे दिसते आहे किंवा बहुमताच्या अगदी जवळ आहे. त्याचबरोबर 3 पोलमध्ये भाजप पुढे आहे. मात्र, सर्व पोल्समध्ये तृणमूलला होणारे नुकसान स्पष्ट दिसत आहे.

बंगालमध्ये 1.5 टक्के मतदान कमी झाले, ही तृणमूलसाठी चिंताजनक बाब आहे
2019 च्या लोकसभा निवडणुका घेण्यात आल्या तेव्हा भाजपला बंगालमधील 128 विधानसभा जागांवर आघाडी मिळाली होती, तर तृणमूल पक्षाला केवळ 158 जागांवर आघाडी मिळवून दिली होती. यावेळी कमी मतदानामुळे तृणमूलची चिंता वाढली आहे. यावेळी 8 टप्प्यांत सरासरी मतदान 81.59% मतदान झाले, तर 2016 च्या विधानसभा निवडणुकीत हा आकडा 83.02% होता. म्हणजेच, यावेळी मतदानात सुमारे 1.5% घट झाली आहे. 1.5% च्या फरकामुळे अनेक जागांवर परीणाम होऊ शकतो.

काँग्रेस-लेफ्ट किंग-मेकर बनणार का?
बंगालमधील संपूर्ण निवडणुका मोदी विरुद्ध दीदींवर केंद्रित आहेत, पण ग्राऊंड रिपोर्ट्स आणि एक्झीट पोल असेही सूचित करतात की तृणमूल आणि भाजप दोन्ही 'काटे की टक्क'मध्ये बहुमताच्या मागे राहतील. अशा परिस्थितीत बंगालमधील सर्वात कमकुवत समजल्या जाणार्‍या डाव्या-कॉंग्रेसची युती किंगमेकरच्या भूमिकेत येऊ शकते. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेफ्ट-काँग्रेस कधीच भाजपसोबत जाणार नाही. त्याचवेळी, कॉंग्रेस एकदा तृणमूलबरोबर जाऊ शकतो, परंतु तृणमूल आणि डावे एकमेकांचा कडाडून विरोध करतात.

2. आसाम
एकूण जागा : 126
बहुमत : 64
गेल्या वेळी कोण जिंकले :भाजप+

पक्षआघाडीविजयीएकूण
भाजप +76076 (+02)
काँग्रेस +49049 (-2)
इतर101 (0)

आसाममध्ये गेल्या वेळी एनडीएला प्रथमच सत्ता मिळाली होती, परंतु 12 जागा जिंकून भाजपला सत्ता मिळविण्यात मदत करणार्‍या बोडोलँड पीपल्स फ्रंटने यावेळी कॉंग्रेस आणि डाव्यांशी हातमिळवणी केली. आसाम गण परिषद भाजपकडेच आहे. भाजपने यूपीएलएलशीही युती केली. येथे एनआरसी अर्थात राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा ​​मुद्दा कायम वर्चस्व गाजवत आहे. जर भाजपचा विजय झाला तर मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल पुन्हा मुख्यमंत्री होतील. जर भाजपचा पराभव झाला तर याला एनआरसी परिणाम म्हणून पाहिले जाईल. आसाममध्ये सर्व 6 एक्झिट पोलमध्ये भाजप युतीला बहुमत मिळाले.

3. तामिळनाडू
एकूण जागा :
234
बहुमत : 118
गेल्या वेळी कोण जिंकले : अन्नाद्रमुक

पक्षआघाडीविजयीएकूण
द्रमुक +1500150 (+52)
अन्नाद्रमुक+83083 (-53)
इतर101 (+1)

जयललिता आणि करुणानिधीशिवाय येथे प्रथमच विधानसभा निवडणुका घेण्यात आल्या. जयललितांच्या अनुपस्थितीत एआयएडीएमकेकडे मुख्यमंत्री पलानीस्वामी म्हणून एकच चेहरा होता. त्याच वेळी, द्रमुकचा चेहरा करुणानिधी यांचा मुलगा स्टालिन आहे. या कारणास्तव, सर्व एक्झिट पोलमध्ये या वेळी द्रमुकच्या विजयाचा अंदाज वर्तवला जात होता. अन्नाद्रमुकने यावेळी भाजपबरोबर निवडणूक लढवली, तर द्रमुकने कॉंग्रेसशी युती केली.

4. केरळ
एकूण जागा :
140
बहुमत : 71
गेल्या वेळी कोण जिंकले : LDF

पक्षआघाडीविजयीएकूण
माकपा+991100(+9)
काँग्रेस+40040 (-7)
भाजप +000 (+1)
इतर000 (-1)

विशेष म्हणजे बंगालमध्ये कॉंग्रेस आणि डावे एकत्र निवडणुका लढवतात, तर केरळमध्ये त्यांचा एकमेकांना विरोध आहे. डाव्या नेतृत्वाखालील एलडीएफने गेल्या वेळी येथे विजय मिळवला होता. कॉंग्रेस हा त्याचा भाग नाही. कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ येथे विरोधी पक्ष आहे. यावेळी भाजपने 140 पैकी 113 उमेदवार रिंगणात उतरवले. दुसरीकडे, भाजपने गेल्या वेळी केरळमध्ये 1 जागा जिंकली होती.

5. पुद्दुचेरी
एकूण जागा : 30
बहुमत : 16
गेल्या वेळी कोण जिंकले : काँग्रेस+द्रमुक

पक्षआघाडीविजयीएकूण
काँग्रेस+213

AINRC+

369
इतर202

पुद्दुचेरी हे एक केंद्रशासित प्रदेश आहे. कॉंग्रेसप्रणीत सरकार गेल्या फेब्रुवारीमध्ये पडले होते. व्ही. नारायणसामी बहुमत सिद्ध करू शकले नाहीत. दोन मंत्री भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर आणि काही आमदारांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या हातातून सत्ता घसरली. या वेळी 3 एक्झिट पोलमध्ये भाजप आणि AINRC आणि उर्वरित 3 पोल्समध्ये कॉंग्रेस + द्रमुक यांना बहुमत मिळण्याची अपेक्षा असल्याचे सांगितले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...