आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोलकाता:पेगासस प्रकरणी पश्चिम बंगाल सरकारने स्थापला चौकशी आयोग, सुप्रीम काेर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती मदन लोकूर यांचाही समावेश

कोलकाता3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दक्षिणेत भाजपला पहिल्यांदा सत्ता मिळवून देणाऱ्या येद्दींची खुर्ची गेली

पश्चिम बंगाल सरकारने पेगासस हेरगिरी प्रकरणाच्या चौकशीसाठी दोन सदस्यांच्या आयोगाची स्थापना केली. त्यापैकी एक सदस्य सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती मदन बी. लोकूर हे आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी दिल्लीला रवाना होण्याआधी ही घोषणा केली.

ममता म्हणाल्या, ‘कोलकाता हायकोर्टाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती ज्योतिर्मय भट्टाचार्य हे आयोगाचे दुसरे सदस्य आहेत. पेगाससच्या टार्गेट लिस्टमध्ये प. बंगालच्याही लोकांची नावे आहेत. आयोग या प्रकरणाच्या सर्व पैलूंची पडताळणी करून अहवाल देईल. केंद्र सरकार प्रकरणाच्या चौकशीसाठी आयोग स्थापन करेल किंवा मग कोर्टाच्या निगराणीत चौकशीचे आदेश दिले जातील, असे आम्हाला वाटले होते. पण तसे झाले नाही. त्यामुळे आम्ही चौकशी आयोग स्थापण्याचा निर्णय घेतला आहे.’ बंगाल निवडणुकीतील विजयानंतर ममता प्रथमच सोमवारी दिल्लीत पोहोचल्या. सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायमूर्तींनी १२ जानेवारी २०१८ रोजी पत्रकार परिषद घेतली होती, त्यात न्या. लोकूर हेही होते.

बातम्या आणखी आहेत...