आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापश्चिम बंगालमध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्य दिसून आले आहे. हुगळीच्या गरीब कुटुंबात जन्मलेल्या अन्वर अलीने रक्तापेक्षा माणुसकीचे नाते मोठे असते हे सिद्ध केले आहे. हिंदू वडिलांच्या मृत्यूनंतर अन्वरने त्यांना मुखाग्नी देऊन कर्तव्य पार पाडले. त्याच्या या कृत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
श्रीरामपूर येथील डे स्ट्रीट येथे राहणारा अन्वर अली हा व्यवसायाने मार्बल मिस्त्री आहे. तर, श्रीरामपूरचे रहिवासी सुजित हलदर हे शास्त्रज्ञ होते. त्यांना चैताली नावाची मुलगी असून ती लग्नानंतर सायप्रसमध्ये (परदेशात) राहते. तीसुद्धा शास्त्रज्ञ आहे. मुलीच्या लग्नानंतर सुजित यांना असाध्य आजार जडला होता. यादरम्यान त्यांची मुलगी परत येऊ शकली नाही आणि घराजवळ राहणारे अन्वर अली हे सुजित यांच्या वृद्धापकाळाचा आधार बनले.
अन्वर यांचा सुजित यांना आधार
सुजित यांनी अन्वर यांना आपला मुलगाच मानले. जेव्हा-जेव्हा सुजित यांची प्रकृती बिघडायची तेव्हा अन्वर त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे. जेव्हा-जेव्हा त्यांना रक्ताची गरज भासली, तेव्हा अन्वर यांनी त्यांना रक्त दिले. मुलगा असण्याचे कर्तव्य त्यांनी उत्तम प्रकारे पार पाडले. यादरम्यान सुजीत यांनी आपल्या मृत्यूनंतर आपला मुस्लिम मुलगा अन्वर अली आपल्याला अग्नी देईल, अशी इच्छा व्यक्त केली.
पूर्ण रीतिरिवाजाने अंत्यसंस्कार
अन्वर अली यांनी मानलेल्या वडिलांची इच्छा पूर्ण केली. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी मुलाचे कर्तव्य पार पाडले आणि मुस्लिम असूनही संपूर्ण हिंदू रीतिरिवाजांनुसार त्यांचे अंत्यविधी पार पाडले.
बंगालमधील बीरभूम हत्याकांडात 20 जणांना अटक, सीबीआयचा तपास सुरू
पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील बागतुई गावात 21 मार्च रोजी तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) नेते भादू शेख यांच्या हत्येनंतर हिंसाचार उसळला होता. यामध्ये 2 मुलांसह 10 जणांचा मृत्यू झाला. कोलकाता उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. आतापर्यंत 20 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापैकी 10 आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. उर्वरित 10 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.