आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापश्चिम बंगालच्या हुगळीत रविवारी दोन गटांमध्ये हिंसक हाणामारी झाली. मिरवणुकीदरम्यान रिशरा परिसरात जोरदार दगडफेक झाली. यानंतर वाहनांना आग लावण्यात आली. हिंसक जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या.
दगडफेकीत भाजप आमदार बिमान घोष जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वृत्तानुसार, हिंसाचारात अनेक पोलिस जखमी झाले आहेत. या भागात कलम 144 लागू करण्यात आले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हुगळी हिंसाचारात आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आली आहे. भाजप नेते दिलीप घोष म्हणाले की, महिला आणि लहान मुलांवर दगडफेक करण्यात आली. हावडा येथील हिंसाचारानंतरही राज्य सरकारने कोणतीही कारवाई केली नाही.
आता हावडाच्या शिबपूरमध्ये वातावरण शांत, काही भागात कलम 144
पश्चिम बंगालमधील हावडा आणि उत्तर दिनाजपूर जिल्ह्यात गुरुवारी मिरवणुकीदरम्यान हिंसक संघर्ष झाला. शिबपूर येथे शुक्रवारी पुन्हा एकदा दगडफेकीची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 38 जणांना अटक केली आहे. तर दोन गुन्हे दाखल झाले आहेत.
हावडा पोलिस आयुक्त म्हणाले की, परिस्थिती आता सामान्य आहे आणि लोकांनी या प्रकरणाची काळजी करण्याची गरज नाही. काही भागात कलम 144 लागू करण्यात आले असून या भागात पोलिस गस्त घालत आहेत. दुसरीकडे विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी आणि ममता यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांनी न्यायालयात एनआयए चौकशीची मागणी केली.
ममता म्हणाल्या, मिरवणुकीचा मार्ग कसा बदलला?
या घटनांसाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थेट भाजपला जबाबदार धरले. भाजपचे नाव न घेता ममता म्हणाल्या की, ‘ते जातीय दंगलीसाठी बाहेरून गुंड बोलावत आहेत. त्यांच्या मिरवणुका कोणी रोखल्या नाहीत, पण तलवारी आणि बुलडोझर घेऊन मोर्चा काढण्याचा अधिकार त्यांना नाही. हावड्यात असे करण्याची त्यांची हिंमत कशी झाली?'
ममता म्हणाल्या की, 'त्यांनी मार्ग का बदलला? विशेषत: एका समुदायाला लक्ष्य करण्यासाठी आणि त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी अनधिकृत मार्ग का निवडावा? भाजपने नेहमीच हावडा, पार्क सर्कस आणि इस्लामपूरला लक्ष्य केले आहे.’
बिहार: सासाराम, नालंदा आणि मुंगेरमध्ये पुन्हा हिंसाचार, बॉम्ब फेक, गोळ्या झाडल्या
नालंदा : 30 राउंड फायर
शनिवारी नालंदा येथील बिहार पोलिस स्टेशन परिसरात दोन्ही बाजूंमध्ये गोळीबार झाला होता. यामध्ये 3 जणांना गोळ्या लागल्या आहेत. नंतर त्यातील एकाचा मृत्यू झाला. शुक्रवारी जिथे हिंसाचार झाला, तिथून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या नालंदामध्ये शनिवारी पुन्हा हिंसाचार झाला. यावेळी सुमारे 30 राउंड गोळीबार करण्यात आला. नालंदाच्या बिहारशरीफमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
सासाराम : येथे शुक्रवारीही हिंसाचार झाला. येथील सफुलागंज परिसरात शनिवारी सायंकाळी पुन्हा बॉम्ब फेकण्यात आले. आतापर्यंत एकूण 25 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
मुंगेर : मूर्ती विसर्जनाच्या वेळी शनिवारी वाद झाला. दोन्ही पक्षांमध्ये दगडफेक आणि हाणामारी झाली. पोलिसांच्या वाहनाचीही तोडफोड करण्यात आली आहे. अनेक जण जखमी झाले आहेत. दोन गावांतील तणाव पाहता एसडीएम, डीएसपीसह अनेक पोलिस ठाण्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे.
बंगाल, महाराष्ट्रातही हिंसाचार
बंगाल आणि महाराष्ट्रातही चार दिवसांपूर्वी हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. गेल्या तीन दिवसांपासून वातावरण शांत असले तरी. या राज्यांतील हिंसाचारग्रस्त भागात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बंगाल-बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू करण्यात आले. बंगालच्या हावडामध्ये तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे, परंतु एनआयए तपासाची मागणी केली जात आहे.
महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील किराडपुरा भागात बुधवारी-गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी पुन्हा हिंसाचार झाला. आतापर्यंत 10 जणांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी-गुरुवारी रात्री दोन गटात हाणामारी झाली, त्यात लोकांनी एकमेकांवर दगडफेक केली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांवरही लोकांनी दगडफेक करून त्यांची वाहने पेटवून दिली. या हल्ल्यात 10 पोलिसांसह 12 जण जखमी झाले आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.