आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगालच्या हुगळीत पुन्हा हिंसाचार:दगडफेकीनंतर रिशरा रेल्वे स्थानक बंद, हावडा-बर्डमन मार्गावरील सर्व गाड्या थांबल्या

कोलकत्ता2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारी रात्री उशिरा हुगळीच्या रिशरा भागात पुन्हा एकदा हिंसाचार उसळला. त्यानंतर तेथील रेल्वे स्टेशन बंद करण्यात आले.  - Divya Marathi
सोमवारी रात्री उशिरा हुगळीच्या रिशरा भागात पुन्हा एकदा हिंसाचार उसळला. त्यानंतर तेथील रेल्वे स्टेशन बंद करण्यात आले. 

पश्चिम बंगालमध्ये सलग तिसऱ्या दिवशी हिंसाचार सुरू आहे. हुगळीच्या रिशरा भागात सोमवारी रात्री उशिरा रेल्वे स्टेशनबाहेर दगडफेक झाली. त्यामुळे रेल्वे स्थानक बंद करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्टेशनच्या गेट क्रमांक 4 च्या बाहेर ही दगडफेक झाली.

हावडा-बर्डमन मार्गावर धावणाऱ्या सर्व गाड्या बंद करण्यात आल्या. प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे. स्थानकाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हुगळीत मिरवणुकीदरम्यान सुरू झाला हिंसाचार
तत्पूर्वी, रविवारी रिश्रा शोभायात्रेदरम्यान दोन गटात वाद सुरू झाला. त्याचे रुपांतर हिंसकरित्या हाणामारीत झाले. दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक करून वाहनांची जाळपोळ केली होती. दगडफेकीत भाजप आमदार बिमान घोष जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हुगळी आणि आसपासच्या भागात कलम 144 लागू करण्यात आले आहे. आतापर्यंत या हिंसाचारात सहभागी 12 जणांना अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर हावडा येथील हिंसाचारावर कोलकाता उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडून 5 एप्रिलपर्यंत उत्तर मागितले आहे.

हुगळीत रविवारी मिरवणुकीत हिंसक संघर्ष झाला. अनेक वाहने जाळण्यात आली.
हुगळीत रविवारी मिरवणुकीत हिंसक संघर्ष झाला. अनेक वाहने जाळण्यात आली.

रविवारी मिरवणुकीत झालेल्या हिसाचाराची काही फोटो.....

दोन्ही गटांच्या हल्लेखोरांनी परिसरात आग लावली, ज्यात अनेक वाहने जळून खाक झाली.
दोन्ही गटांच्या हल्लेखोरांनी परिसरात आग लावली, ज्यात अनेक वाहने जळून खाक झाली.
हुगळीत हिंसक वातावरण असल्याने आजूबाजूच्या भागात कलम 144 लागू करण्यात आले आहे.
हुगळीत हिंसक वातावरण असल्याने आजूबाजूच्या भागात कलम 144 लागू करण्यात आले आहे.
हिंसक जमावाला रोखण्यासाठी आलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. अनेकांना अटक करण्यात आली आहे.
हिंसक जमावाला रोखण्यासाठी आलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. अनेकांना अटक करण्यात आली आहे.
हल्लेखोरांनी घरांवर, महिला आणि लहान मुलांवरही दगडफेक केली आणि अनेक जखमी झाले.
हल्लेखोरांनी घरांवर, महिला आणि लहान मुलांवरही दगडफेक केली आणि अनेक जखमी झाले.

भाजप-काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
भाजप नेते दिलीप घोष म्हणाले की, हल्लेखोरांनी लहान मुले आणि महिलांवरही हल्ला केला. हावडा येथील हिंसाचारानंतरही राज्य सरकारने कोणतीही कारवाई केलेली नाही. त्याचवेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, भाजपला जेव्हा आपण कमकुवत होत आहोत असे वाटते तेव्हा तो दंगली आणि हिंसाचाराचा अवलंब करतो. लोकांमध्ये फूट पाडण्यासाठी भाजप हे करत आहे.

हे ही वाचा

बंगालच्या हुगळीत मिरवणुकीदरम्यान हिंसाचार : दोन गटांत दगडफेक-जाळपोळ

पश्चिम बंगालच्या हुगळीत रविवारी दोन गटांमध्ये हिंसक हाणामारी झाली. मिरवणुकीदरम्यान रिशरा परिसरात जोरदार दगडफेक झाली. यानंतर वाहनांना आग लावण्यात आली. हिंसक जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. - येथे वाचा संपूर्ण बातमी

हिंसाचाराचे पेव : रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी बंगालमध्ये पुन्हा दगडफेक; काल गुजरात-महाराष्ट्रात हिंसाचार, 80 जणांना बेड्या

पश्चिम बंगालमध्ये रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा हिंसाचार उफाळला आहे. दंगेखोरांनी हावड्यात दगडफेक केली. दुसरीकडे, देशातील राज्यांतही रामनवमीच्या दिवशी हिंसाचार व जाळपोळ झाली. गुजरातच्या वडोदरा, महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, पश्चिम बंगालच्या हावडा-इस्लामपूर व उत्तर प्रदेशच्या लखनऊत 2 समुदायात हिंसक झडप झाली. - येथे वाचा संपूर्ण बातमी