आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापश्चिम बंगालमधील खरगपूर रेल्वे स्थानकात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. स्टेशनच्या फलाटावर उभ्या असलेल्या टीटीईवर विजेची तार पडली. त्यामुळे टीटीईच्या अंगातून ठिणग्या निघू लागल्या आणि तो पाठीमागे असलेल्या रेल्वे रुळावर पडला.
घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सद्या त्याची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना बुधवारची असल्याचे सांगितले जात आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये दोन टीटीई प्लॅटफॉर्मवर उभे राहून बोलत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर मागून विजेची तार तुटून एका टीटीईच्या डोक्यात पडली. त्यामुळे त्याच्या अंगावर ठिणग्या पडल्या आणि तो रुळांच्या मध्ये पडला. हे पाहून शेजारी उभ्या असलेल्या टीटीईला धक्का बसला.
स्थानकावर उपस्थित लोकांनी जखमी टीटीईला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की केबल सैल होती, जी पक्ष्याला धडकल्यानंतर टीटीईच्या डोक्यावर पडली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.