आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापहिल्या नजरेत कुणीही सांगू शकणार नाही की चित्रात दिसणारी महिला खरोखरची महिला नसून तो एक पुतळा आहे. कोलकाता येथील 65 वर्षीय तपन सिंह यांनी पत्नीच्या वियोगाने दुःखी न होता तिच्या प्रेमापोटी हुबेहुब दिसणारा सिलिकॉनचा पुतळा तयार करुन घेतला आहे.
तपन सिंह यांची पत्नी इंद्राणी यांचा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यू झाला होता. यानंतर तपन सिंह यांनी अडीच लाख रुपये खर्चून पत्नीचा पुतळा बनवला.
शहरातील कैखली भागात राहणारे तपन सिंह हे निवृत्त केंद्रीय कर्मचारी आहेत. तपन सिंह म्हणाले की, तो सुमारे 10 वर्षांपूर्वी पत्नीसह मायापूरमधील इस्कॉन मंदिरात गेला होता. येथे दोघांनी एसी भक्तिवेदांत स्वामींची जिवंत मूर्ती पाहिली. ती मुर्ती पाहून इंद्राणी या खूप प्रभावित झाल्या होत्या. माझ्यानंतर तुम्ही माझा असाच पुतळा बनवा, अशी इच्छा इंद्राणी यांनी व्यक्त केली होती. तेव्हा त्या गमतीने म्हणाल्या होत्या.
कोरोनाने मृत्यू
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत इंद्राणी यांना संसर्ग झाला. त्यानंतर 4 मे 2021 रोजी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने तपन सिंह यांना हादरवून सोडले. त्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी इंटरनेटवर सिलिकॉनच्या मूर्ती बनवणाऱ्या लोकांचा शोध सुरू केला.
तपन यांचा शोध 2022 च्या सुरुवातीला संपला. त्यांनी आपल्या पत्नीचा पुतळा बनवण्याची जबाबदारी शिल्पकार सुबिमल दास यांच्यावर सोपवली. इंद्राणी यांची मूर्ती बनवण्यासाठी सुबिमल यांनी इंद्राणी यांची छायाचित्रे मागवली. सुबिमल यांनी पहिल्यांदा मातीचे मॉडेल बनवले, नंतर फायबर मोल्डिंग आणि सिलिकॉन कास्टिंग केले.
6 महिन्यांत मूर्ती बनवली
या कामासाठी सहा महिन्यांचा कालावधी आणि अडीच लाख रुपये खर्च झाले. आता तपन सिंह यांच्या घरी येणार्या कोणालाही इंद्राणी येथे नाहीत, असे वाटत नाही. पुतळ्याचे वजन 30 किलो असून, तपन यांनी पुतळ्याला सोन्याचे दागिने घातले आहेत. तपन म्हणाले की, सुरुवातीला माझे अनेक नातेवाईक या निर्णयाच्या विरोधात होते. मात्र, नंतर सर्वांनी माझ्या आग्रहापुढे मान झुकवली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.