आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • West Bengal Mamata Banerjee Update; TMC MLA Madan Mitra, Sovhan Chatterjee Admitted

बंगाल नारदा स्टिंग केस:तृणमूल आमदार मदन मित्रा आणि माजी मंत्री सोवन चटर्जी रुग्णालयात ॲडमिट, कालच CBI ने यांना अटक केली होती

कोलकाता4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नारदा स्टिंग प्रकरणात अटक केलेले तृणमूल कॉंग्रेसचे (TMC) आमदार मदन मित्रा आणि माजी मंत्री सोवन चटर्जी यांची प्रकृती सोमवारी रात्री उशिरा खालावली. दोन्ही नेत्यांना रात्री 3 वाजता प्रेसिडेंसी जेलमधून SSKM रुग्णालयाच्या वुडबर्न ब्लॉकमध्ये हलवण्यात आले. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. या दोघांव्यतिरिक्त सोमवारी सीबीआयने फिरहद हकीम आणि सुब्रत मुखर्जी यांना अटक केली होती.

छापेमारीनंतर केली होती अटक
यापूर्वी सोमवारी CBI ने विविध ठिकाणी छापे मारले होते. त्यानंतर ममता सरकारमधील मंत्री फिरहाद, सुब्रत मुखर्जी, आमदार मदन मित्रा आणि माजी मंत्री सोवन चटर्जी यांची चौकशी केली होती. त्यानंतर या सर्वांना अटक करून कोर्टात हजर करण्यात आले. CBI ला कोर्टाकडून या चौघांची कस्टडी हवी होती, मात्र न्या. अनुपम मुखर्जींनी चौघांनाही अटकेच्या 7 तासांतच जामीन दिला.

हायकोर्टाने जामिनाला स्थगिती दिली
त्याविरुद्ध सीबीआयने कोलकाता हायकोर्टात दाद मागितली. हायकोर्टाने रात्री चारही आरोपींच्या जामिनाला स्थगिती दिली. तृणमूल नेत्या चंद्रिमा भट्‌टाचार्यांनी अटकेविरुद्ध एफआयआर नोंदवला.

2014 मध्ये स्टिंग ऑपरेशन, 2016 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आली होती टेप
नारद टीव्ही न्यूज चॅनलने 2014 मध्ये स्टिंग ऑपरेशन केले होते. यात तृणमूल काँग्रेसचे मंत्री, खासदार आणि आमदार फायदा करून देण्याच्या बदल्यात कंपनीच्या प्रतिनिधींकडून पैसे घेताना दिसले हाेते. त्याची व्हिडिओ टेप 2016 च्या राज्य विधानसभा निवडणुकीच्या ऐन मोक्यावर समोर आली होती. कोलकाता हायकोर्टाने 2017 मध्ये प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते.

कोण आहेत आरोपी : हकीम, मुखर्जी व मित्रा यंदा आमदार झाले. चटर्जी यांनी तृणमूलमधून भाजपमध्ये पक्षांतर केले होते. मात्र यानंतर त्यांनी भाजपलाही सोडचिठ्ठी दिली होती. पाचवे आरोपी आयपीएस अधिकारी एसएमएच मिर्झा जामिनावर आहेत.

बातम्या आणखी आहेत...