आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ल्याची घटना जोर धरत आहे. राज्यातील ममता बॅनर्जी सरकारमधील मंत्री सुब्रत बॅनर्जी यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. मुखर्जी शनिवारी रात्री म्हणाले - नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला करण्याचा कट भाजप नेत्यांनीच रचला होता. राज्यात पुढची निवडणूक जिंकण्यात भाजप असमर्थ झाले तर ते ममतांना मारण्याचा कटही आखू शकतात
भाजपचे षडयंत्र
भांगर शहरात रॅली दरम्यान सुब्रत यांनी भाजपवर खूप गंभीर आरोप केले. ते म्हणाले- राज्यात भाजपला हिंसाचार पसरवायचा आहे यात कोणतेही दुमत नाही. नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला झाला त्याचा कट भाजपनेच रचला होता. सुब्रतो पुढे म्हणाले- जर भाजप निवडणूक जिंकू शकले नाही तर काही लोकांना गुप्त पद्धतीने राज्यात पाठवले जाऊ शकते आणि त्यांच्या माध्यमातून ममता बॅनर्जी यांच्या हत्येचा कट रचला जाऊ शकतो.
सुब्रत यांनी पुढे म्हटले - मी पूर्ण जबाबदारीसह भाजपवर आरोप लावत आहे. याचा तपास करण्यात यावा. जर हे चुकीचे ठरले तर मी वचन देतो की, मी राजकारण सोडून देईल.
नड्डांवर हल्ला झाल्याने सुरू झाला वाद
पश्चिम बंगाल दौर्यावर आलेल्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर गुरुवारी दगडफेक करण्यात आली. यात पश्चिम बंगालचे प्रभारी कैलास विजयवर्गीय यांच्यासह काही नेते जखमी झाले. तृणमूल कॉंग्रेस (टीएमसी) समर्थकांवर दगडफेक करण्याचा आरोप लावला गेला. नड्डा हे कोलकाताहून 24 परगणा जिल्ह्यातील डायमंड हार्बर शहराकडे जात असताना दगडफेकी झाली. डायमंड हार्बर हा ममतांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यांचा संसदीय मतदार संघ आहे.
दगडफेकीचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांवर लावण्यात आला होता. आंदोलनकर्त्यांनी नड्डा यांच्या ताफ्याचा रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला होता. TMC ने आरोप फेटाळून लावले होते.
ममता म्हणाल्या होत्या - कधी चड्ढा, तर कधी नड्डा नोटंकी करायला लावतात
नड्डा यांच्यावर हल्ला झाल्यानंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या- कधी गृहमंत्री असतात तर कधी चड्डा, नड्डा, फड्डा आणि भड्डा. जेव्हा त्यांना प्रेक्षक मिळत नाहीत तेव्हा ते त्यांच्या कामगारांना अशा प्रकारच्या नौटंकी करायला लावतात.
ममतांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना नड्डा म्हणाले होते, 'मला सांगण्यात आले की त्यांनी माझ्याबद्दल बर्याच संज्ञा दिल्या आहेत. हे त्यांच्या संस्काराविषयी सांगते. ही बंगालची संस्कृती नाही. आमचे पंतप्रधान म्हणतात की बंगालची भाषा सुंदर आहे, बंगालची संस्कृती सर्वात सुंदर आहे. ममताजी या जी शब्दावली वापरतात ती सूचित करतात की त्यांना बंगाल समजत नाही. बंगाल आपल्या सर्वांचा आहे.
11 डिसेंबरला बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी ममता यांच्यावर आरोप लावले होते की, त्या आगसोबत खेळत आहेत. त्यांनी संविधानाच्या चौकटीत राहून काम करायला हवे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.