आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापश्चिम बंगालमधील नदिया येथे एका 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कारानंतर तिचा मृत्यू झाला आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी यासाठी तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) पंचायत सदस्याच्या मुलावर आरोप केले आहेत. टीएमसी नेत्याच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. त्याचवेळी, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेबाबत कुटुंबाच्या गँगरेपच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले.
ममता म्हणाल्या, 'तिच्यावर बलात्कार झाला होता, ती गरोदर होती का, की प्रेमप्रकरण होते की ती आजारी होती, हे तुम्हाला कसं माहिती?' त्या म्हणाल्या की जर हे जोडपे रिलेशनशिपमध्ये असतील तर आम्ही त्यांना कसे रोखू, हे यूपी नाही की मी लव्ह जिहादच्या नावाखाली असे करेन.
या प्रकरणाची जबाबदारी ममतांनी सोपवली बाल आयोगाकडे
सीएम ममता म्हणाल्या, 'मुलगी 5 तारखेला मरण पावली आणि पोलिसांना 10 तारखेला कळलं. 5 एप्रिल रोजी तिचा मृत्यू झाला आणि तक्रार असेल तर घटनेच्या दिवशी पोलिसांकडे का गेले नाही? त्यांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. पोलिसांना पुरावे कुठून मिळणार?' याप्रकरणी बाल आयोग बलात्कार आणि हत्येची चौकशी करेल, असं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
सीबीआय चौकशीच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला प्रश्न
या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी विनंती मुलीच्या कुटुंबीयांनी सोमवारी कोलकाता उच्च न्यायालयात केली. यावर ममता यांनी आक्षेप घेतला. ममता म्हणाल्या की, दिल्ली, यूपी, राजस्थान, आसाम आणि बिहारमध्ये होणाऱ्या खुनाच्या किती प्रकरणांमध्ये सीबीआय तपास करते? किती नेत्यांना अटक झाली? ममता पुढे म्हणाल्या, 'तुम्ही सीबीआय आणि ईडी वापरून किती कट रचता याची आम्हाला पर्वा नाही. आम्ही कमजोर आहोत असे समजू नका.
कुटुंबीयांचा टीएमसी नेत्याच्या मुलावर आरोप
कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांची मुलगी नववीत शिकत होती. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, मुलगी सोमवारी (4 एप्रिल) त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी होण्यासाठी आरोपीच्या घरी गेली होती, परंतु ती घरी परतली तेव्हा तिची अवस्था वाईट होती. कुटुंबीयांनी सांगितले की, मुलीला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता, तिच्या पोटात तीव्र वेदना होत होत्या आणि आम्ही तिला रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. आरोपी आणि त्याच्या मित्रांनी मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचा त्यांचा दावा आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, टीएमसी नेते ब्रज गोपाल गोला यांचा 21 वर्षीय मुलगा या प्रकरणात मुख्य आरोपी आहे.
टीएमसी नेत्याच्या दबावाखाली मुलीवर अंत्यसंस्कार
या घटनेच्या चार दिवसांनंतर शनिवारी (९ एप्रिल) मुलीच्या कुटुंबीयांनी हांसखाली पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, स्थानिक टीएमसी नेत्याच्या दबावाखाली पोलिसांनी मुलीचे मृत्यू प्रमाणपत्र न देता जबरदस्तीने तिचे अंत्यसंस्कार केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.