आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बंगालमध्ये भाजप नेत्यांवर क्रिमिनल केस दाखल केल्याप्रकरणात सुप्रीम कोर्टात शुक्रवारी सुनावणी झाली. यात कोर्टाने पश्चिम बंगाल सरकारला नोटिस जारी करुन आदेश दिला आहे की, पुढील सुनावणीपर्यंत राज्यातील भाजप नेत्यांवर कोणत्याच प्रकारची अॅक्शन घेऊन नका. प्रकरणाची पुढील सुनावणी जानेवारीत होईल.
ही याचिका भाजपचे बंगाल प्रभारी कैलाश विजयवर्गीय, खासदार अर्जुन सिंह आणि इतर भाजप नेत्यांनी दाखल केली होती. यात म्हटले होते की, बंगालमध्ये त्यांच्यावर दाखल केलेले खटले रद्द केले जावेत किंवा इतर राज्यांमध्ये ट्रासंफर केले जावेत. तसेच, याचिकेतून आरोप लावण्यात आले की, हे खटले खोटे आणि जाणूनबुजून दाखल करण्यात आले आहेत.
तृणमूलच्या अजून एका आमदाराने पक्ष सोडला
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बनर्जी यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. एकीकडे भाजप राज्यात आपला विस्तार करत आहे, तर दुसरीकडे ममतांचे आमदार त्यांची साथ सोडत आहेत. शुक्रवारी पक्षातील आमदार शीलभद्र दत्ता यांनी राजीनामा दिला. यापूर्वी शुभेंदु अधिकारी आणि जितेंद्र तिवारी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. याशिवाय तृणमूलमधील नेते कबीरुल इस्लामने पक्षाच्या मायनोरिटी सेलच्या जनरल सेक्रेटरी पदाचा राजीनामा दिला आहे.
संध्याकाळी 6.30 वाजता लॉ अॅड ऑर्डरवर मीटिंग
दरम्यान, आज संध्याकाळी 6.30 वाजता केंद्र आणि राज्य सरकारचे अधिकारी व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे मीटिंग घेणार आहेत. यात राज्यात लॉ अँड ऑर्डरवर चर्चा होणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.