आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • West Bengal News And Update ; Mamata Banerjee To Rally In Birbhum To Respond To Amit Shah's Road Show

बॅटल ऑफ बंगाल:अमित शाह यांच्या 'रोड शो'ला प्रत्युत्तर देण्यासाठी ममता बॅनर्जीदेखील बीरभूममध्ये रॅली करणार

कोलकाता7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ' भाजप लोकांचे भविष्य ठरवू शकत नाही'

बंगालमध्ये तृणमूल आणि भाजपमधील राजकीय युद्ध दररोज वाढत आहे. गृह मंत्री अमित शाह यांचा 2 दिवसीय बंगाल दौरा संपल्यानंतर आता मुख्यमंत्री ममता बनर्जींनी पत्रकार परिषद घेऊन अमित शाह यांच्या प्रश्नांना उत्तर दिले आहे. 'गृह मंत्र्यांना खोटं बोलणे शोभत नाही. तुमच्या प्रश्नांना लवकरच उत्तर देईल,' अशी प्रतिक्रिया तांनी यावेळी दिली.

ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या की, मी 28 डिसेंबरला एका प्रशासकीय बैठकीसाठी बीरभूममला जाणार आहे आणि 29 तारखेला एक भव्य रॅली करणार आहे. बीरभूमच्या बोलपूरमध्ये रविवारी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी एक रोड शो केला होता. यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ममता सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 'बंगाल शिक्षण, आरोग्य आणि विकासाच्या बाबतीत मागास होत आहे आणि भ्रष्टाचार, घराणेशाही आणि राजकीय हिंसेत नंबर वन होत आहे,' असा आरोप त्यांनी यावेळे केला होता.

यावर ममता म्हणाल्या की, भाजपचे लोक काहीपण बोलू शकतात. आम्ही CAA चा तेव्हापासून विरोध करत आहोत, जेव्हा हा कायदा मंजुर करण्यात आला होता. भाजप लोकांचे भविष्य ठरवू शकत नाही, लोकच त्यांचे भविष्य ठरवतील. आम्ही CAA, NPR आणि NRC च्या विरोधात आहोत. कोणत्याही व्यक्तीला देश सोडायची गरज नाही.'

बातम्या आणखी आहेत...