आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mamata Banerjee Alleges That The Governor Of West Bengal Was A Corrupt Person, Whose Name Was In The Chargesheet In The 1996 Hawala Case.

गंभीर आरोप:पश्चिम बंगालचे राज्यपाल एक भ्रष्ट व्यक्ती, त्यांचे नाव 1996 च्या हवाला प्रकरणात चार्जशीटमध्ये होते, ममता बॅनर्जींचा आरोप

कोलकाताएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी राज्यपाल जगदीप धनखड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राज्यापल धनखड एक भ्रष्ट व्यक्ती असल्याचे ममता म्हणाल्या. धनखड यांचे नाव 1996 च्या हवाला जैन प्रकरणात चार्जशीटमध्ये घेण्यात आले होते. तसेच त्यांना पदावरून हटवण्यासाठी आपण तीनदा पत्र पाठवले आहेत असा दावा ममतांनी केला.

पश्चिम बंगालमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री असा वाद सुरू आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने पुन्हा सत्ता स्थापित केली. परंतु, निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारासाठी राज्यपालांनी थेट ममतांना जबाबदार धरले. त्यानंतर ममतांनी 14 पानांचे पत्र पाठवून आपली सत्ता बळकावण्याचे कट कारस्थान सुरू असल्याचे आरोप केले. एवढेच नव्हे, तर आपल्या ट्वीटमध्ये अधिकृत पत्रांचा वापर करत जाऊ नका असेही ममतांनी म्हटले होते.

मंत्र्यांच्या शपथविधीच्या वेळी झाला होता वाद
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सुरू होता. त्यावेळी राज्यपाल धनखड यांनी राज्यातील हिंसाचारावर नाराजी व्यक्त केली होती. राज्य सरकारने हिंसाचार थांबवण्यासाठी काहीच केले नाही. कायद्याचे राज्य संपले. रात्री हिंसाचाराच्या घटना ऐकायला मिळतात आणि सकाळी काहीच झाले नाही असे सांगितले जाते असे राज्यपाल म्हणाले होते.

5 मे रोजी ममतांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावेळी सुद्धा राज्यपालांनी सरकारसमोर हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच मुख्यमंत्र्यांना परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे आवाहन केले होते.

काय आहे हवाला जैन प्रकरण?
20 वर्षांपूर्वी झालेल्या हवाला जैन प्रकरणाने राजकारणात खळबळ उडाली होती. भाजपचे ज्येष्ठ नेते काँग्रेसचे विद्याचरण शुक्ल, अर्जुन सिंह, शरद यादव, मदनलाल खुराना, नारायणदत्त तिवारी अशा मोठ्या नेते मंडळीचा यात हात असल्याचे आरोप करण्यात आले होते. यानंतर एक-एक करून सर्व नेत्यांना क्लीनचिट मिळाली.

115 नेते, अधिकाऱ्यांची नावे होती
या घोटाळ्याला आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा मानले जाते. ज्या परदेशी दलालांकडून पैसा राजकीय पक्षांमध्ये ट्रांसफर करण्यात आला होता. त्याच माध्यमातून दहशतवादी संघटना हिंजबुल मुजाहिद्दीनला फंडिंग सुद्धा झाली होती. या घोटाळ्याचा खुलासा त्यावेळी सुब्रह्मण्यम स्वामी यांनी एका पत्रकार परिषदेतून केला होता. तसेच लालकृष्ण आडवाणी यांनी एसके जैनकडून 2 कोटी रुपये घेतल्याचे आरोप केले होते. यामध्ये 115 नेते आणि अधिकाऱ्यांची नावे घेण्यात आली होती. पण, पुराव्यांच्या अभावी सगळेच निर्दोष मुक्त झाले. यात सर्वात चर्चित आरोपी सुरेंद्र कुमार जैन आणि त्यांचे बंधू जेके जैन होते. त्यामुळे याला हवाला जैन प्रकरण म्हटले जाते.

बातम्या आणखी आहेत...