आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • West Bengal Odisha Assembly Byelections Results Live Updates Mamata Banerjee Bhawanipur Bypoll

भवानीपुरा पोटनिवडणुकीत ममता विजयी:तृणमूल अध्यक्षा ममता बॅनर्जींनी भाजपच्या प्रियंका टिबरेवाल यांना 58 हजार मतांनी हरवले, मुख्यमंत्रीपदाची खुर्ची जाण्याचा धोका टळला

कोलकाता17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विजयानंतर मिरवणूक काढू नका, असे EC चे निर्देश

टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक जिंकली आहे. मुख्यमंत्री ममतांनी भाजपच्या उमेदवार प्रियंका टिबरेवाल यांचा 58,832 मतांनी पराभव केला आहे. TMC कार्यकर्ते मुख्यमंत्री ममतांच्या विजयाचा जल्लोष साजरा करत आहेत.

CM ममता यांनी भाजपच्या उमेदवार प्रियंका टिबरेवाल यांना 58,832 मतांनी हरवले आहे. 21 राउंडच्या मोजणीनंतर ममता यांना 84,709 मते मिळाली.

टीएमसी कार्यकर्ते ममता यांच्या विजयाचा जल्लोष करत आहेत.
टीएमसी कार्यकर्ते ममता यांच्या विजयाचा जल्लोष करत आहेत.

विजयानंतर मिरवणूक काढू नका, असे EC चे निर्देश
निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल सरकारला पोटनिवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान किंवा नंतर विजयाचा उत्सव किंवा कोणतीही मिरवणूक काढण्यास मनाई केली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आयोगाने ममता सरकारला पत्र लिहून हे निर्देश दिले आहेत. यासोबतच आयोगाने निवडणुकीनंतर हिंसाचार होणार नाही यावर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...