आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • West Bengal On The Southern Footsteps; Here Tollywood Celebrities Are Guaranteed To Win

काेलकाता:दक्षिणेच्या पावलावर पश्चिम बंगाल; येथे टाॅलीवूड सेलिब्रिटी म्हणजे जिंकण्याची हमी, त्यांना कंपूत आणण्यासाठी भाजप-टीएमसीमध्ये स्पर्धा

काेलकाता / अक्षय वाजपेयीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बंगालच्या राजकारणात सेलिब्रिटींना आणण्याचा ट्रेंड ममतांनी केला सुरू, आता भाजप त्याच वाटेवर

२०११ मध्ये ममता बॅनर्जी यांनी जेव्हा सीपीएमची गेल्या ३४ वर्षांपासून असलेली सत्ता उलथवून दिली, तेव्हा त्यांना बंगालमधील सेलिब्रिटींचे खूप पाठबळ मिळाले. यामध्ये खासकरून टॉलीवूडच्या (बंगालचा दूरदर्शन व चित्रपट उद्योग) या सेलिब्रिटींचा समावेश होता, ज्यांनी राज्यात बदल घडवून आणण्याचे आवाहन जनतेला केले हाेते. आता ममतांच्याच पावलावर पाऊल टाकत भाजपचीही सेलिब्रिटींचा पाठिंबा घेण्याची इच्छा आहे.. मग संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी मिथुन चक्रवर्ती यांची मुंबईत घेतलेली भेट असेल किंवा डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी रिसर्च फाउंडेशनचे संचालक डॉ. अनिर्बान गांगुली यांची बंगालचे चर्चेतील अभिनेता प्रसेनजित चटर्जी यांची भेट असेल, या सर्वांचा संबंध बंगालमध्ये प्रभाव असलेल्या मोठ्या सेलिब्रिटींना आपल्याबराेबर घेण्याचा भाजप प्रयत्न करत असल्याशी लावला जात आहे.

बांगलादेश चित्रपट उद्याेगातील प्रसिद्ध अभिनेता आणि दाेन वेळा टीएमसीचे आमदार म्हणून निवडून आलेले चिरंजीत चक्रवर्ती म्हणतात, जागा जिंकण्याच्या फाॅर्म्युल्यांतर्गत बंगाली अभिनेत्यांना तिकीट देणे सुरू झाले हाेते. पण आता परिस्थिती बदलली आहे.

बंगाली चित्रपट उद्याेग अतिशय वाईट परिस्थितीतून वाटचाल करत आहे. आधी आम्ही वर्षातून ७५ ते ८० चित्रपट बनवायचाे, आता मुश्किलीने ३० ते ४० चित्रपट बनत आहेत. जे चित्रपट बनत आहेत त्याला प्रेक्षक मिळत नाही. आधी ७५० पेक्षा जास्त चित्रपटगृहे हाेती, आता सिंगल स्क्रिन आणि मल्टिप्लेक्स मिळून बंगालमध्ये १००च्या आसपास चित्रपटगृहे आहेत. त्यामुळे उद्याेगातील लाेकांच्या हाताला काम नाही. पक्षाच्या माध्यमातून मुंबईत प्रवेश मिळेल म्हणून अनेक सेलिब्रेटी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. कारण बंगालमध्ये आता चित्रपटाचा वार्षिक व्यवसाय १०० काेटी पण राहिलेला नाही. आधी ३००-४०० काेटी सहज कमावले जायचे. चक्रवर्ती यांच्या म्हणण्यानुसार बंगालमध्ये विधानसभेच्या २९४ जागा आहेत त्यामुळे ताे प्रत्येक लहान-माेठ्या सेलिब्रेटीला पक्षात घेण्याच्या प्रयत्नात आहे.

ममतांनी २००१ मध्ये तपस पाॅलना दिले हाेते तिकीट
बंगालमध्ये हल्ली सेलिब्रिटींना पक्षात सहभागी करून घेण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. हा ट्रेंडही ममता बॅनर्जी यांनीच सुरू केल्याचे मानले जाते. १९९८ मध्ये ममता बॅनर्जींनी काँग्रेसपासून विभक्त होऊन तृणमूल काँग्रेसची स्थापना केली तेव्हा पक्षाचा पाया तयार करण्यासाठी त्यांनी सेलिब्रिटींना आपल्या साेबत घेणे सुरू केले. त्या वेळी ममता यांनी १९८०-९० च्या दशकातील प्रसिद्ध बंगाली अभिनेता तपस पॉल यांना पक्षात सामील केले, ते २००१ मध्ये टीएमसीचे आमदार झाले होते. ते दोन वेळा पक्षाचे खासदारही होते. हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचे गेल्या वर्षी निधन झाले.

बातम्या आणखी आहेत...