आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • West Bengal Pm Modi Stopped Anoop Chakraborty For Touching His Feet Ans Greeted By Touching Anup's Feet

बंगालमध्ये पंतप्रधानांची रॅली:रॅलीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कार्यकर्त्याला पाया पडून केले अभिवादन

कांथी6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाजपने सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ

पश्चिम बंगालच्या कांथीमध्ये बुधवारी निवडणूक रॅलीदरम्यान एक अनोखे दृष्य पाहायला मिळाले. मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बसले होते, तेव्हा एका भाजप नेत्याने त्यांच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोदींनी त्या कार्यकर्त्याला पाया पडण्यापासून रोखले आणि स्वतः त्या कार्यकर्त्याला पाया पडून अभिवादन केले. पंतप्रधान ज्या नेत्याच्या पाया पडले, ते अनूप चक्रवर्ती कांथीचे भाजपाध्यक्ष आहेत.

भाजपने सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ

या घटनेचा एक व्हिडिओ भारतीय जनता पक्षाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. भाजपने व्हिडिओ पोस्ट करत लिहीले की, भाजप एक अशी सुसंस्कृत संघटना आहे, जिथे कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांबद्दल समान संस्काराची भावना आहे.

बंगालमध्ये 8 टप्प्यात निवडणुका

पश्चिम बंगालमध्ये यंदा 8 टप्प्यात मतदान होणार आहे. 294 जागा असलेल्या विधानसभेसाठी मतदान 27 मार्च (30 सीट), 1 एप्रिल (30 सीट), 6 एप्रिल (31 सीट), 10 एप्रिल (44 सीट), 17 एप्रिल (45 सीट), 22 एप्रिल (43 सीट), 26 एप्रिल (36 सीट), 29 एप्रिल (35 सीट) ला होईल आणि निकाल 2 मे रोजी लागेल.

बातम्या आणखी आहेत...