आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांची घरवापसी थांबवण्याचे भाजपकडून मोठे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, भाजपचे हे प्रयत्न फेल ठरताना दिसत आहेत. बंगाल विधानसभेतील विरोधीपक्ष नेते शुभेंदु अधिकारींनी सोमवारी पक्षाच्या आमदारांसह राज्यपाल जगदीप धनखड यांची भेट घेतली. या भेटीत 24 आमदार हजर नव्हते. तेव्हापासून बंगाल भाजपमध्ये फुट पडण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
शुभेंदु यांचे नेतृत्व मान्य नाही
NDTV च्या एका रिपोर्टनुसार, भाजप नेत्यांच्या राज्यपालांसोबतच्या बैठकीचा उद्देश राज्यात होत असलेल्या हिंसेच्या घटनांसह इतर मुद्द्यांची माहिती देण्याचा होता. पण, या बैठकीतून 74 पैकी 24 आमदार गायब होते. अशात, अनेक नेत्यांच्या घरवापसी चर्चा सुरू झाल्या आहेत. यामागे शुभेंदु अधिकारी यांचे नेतृत्व मान्य नसल्याचे कारण समोर येत आहे.
अनेक आमदारांना करायीचे घरवापसी
रिपोर्टनुसार, भाजपचे अनेक आमदार तृणमूलच्या संपर्कात आहेत. अनेकांना परत तृणमूलमध्ये जाण्याची इच्छा असल्याचे बोलले जात आहे. मागच्या आठवड्यात मुकुल रॉय तृणमूलमध्ये परत आले. आता राजीव बॅनर्जी, दीपेंदु विश्वास आणि सुभ्रांशु रॉयसह इतर नेतेही परत तृणमूलमध्ये येऊ शकतात. रॉय भाजपच्या तिकीटावर कृष्णानगर उत्तरवरुन निवडणूक लढवून जिंकले होते.
30 पेक्षा जास्त आमदार संपर्कात
दरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी म्हटले की, ज्यांनी मुकूल रॉय यांच्यासोबत पक्ष सोडला, त्यांच्या घरवापसीवरच पक्ष विचार करेल. TMC सूत्रांनी सांगितल्यानुसार, 30 पेक्षा जास्त आमदार तृणमूलच्या संपर्कात आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.