आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • West Bengal Political Crisis; Suvendu Adhikari Meet, Bengal BJP, Missing BJP MLAs, Mamata Banerjee, Narendra Modi; News And Live Updates

भाजपमध्ये फूट पडण्याची शक्यता:राज्यापालांसोबत झालेल्या बैठकीत भाजपचे 24 आमदार गायब; तृणमूलमध्ये सामील होण्याचे संकेत

कोलकाता4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रॉय यांचा गेल्या आठवड्यात तृणमूलमध्ये प्रवेश

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसमधील काही नेते भाजपमध्ये सामील झाले होते. त्यामुळे तृणमूल काँग्रेसला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा झटका सहन करावा लागला होता. परंतु, हे नेते भाजपसोडून तृणमूल काँग्रेसमध्ये परत येण्याचे संकेत मिळत आहे. गेल्या आठवड्यात मुकुल रॉय हे भाजपसोडून तृणमूलमध्ये सामील झाले होते.

अशावेळी, भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांनी सोमवारी आपल्या पक्षाच्या शिष्टमंडळासोबत राज्यपाल जगदीप धनखड यांची भेट घेतली. परंतु, या बैठकीमध्ये भाजपचे 24 आमदार गैरहजर होते. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजप पक्षात उभी फूट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शुभेंदू नेता म्हणून मान्य नाही
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, भाजप नेत्यांचा बैठकीचा उद्देश राज्यातील हिंसक आण‍ि चुकीच्या घटनांविषयी माहिती देणे आण‍ि इतर बाबींबर चर्चा करणे होते. परंतु, या बैठकीमध्ये भाजपच्या 74 आमदारांपैकी 24 आमदार गायब होते. त्यामुळे पक्षात पुन्हा एकदा रिवर्स मायग्रेशनची शक्यता वर्तवली जात आहे. याचे कारण शुभेंदू अधिकारी नेता म्हणून सर्वच आमदारांचे मान्य नसल्याचे सांगितले जात आहे.

रॉय यांचा गेल्या आठवड्यात तृणमूलमध्ये प्रवेश
या वृत्तानुसार, भाजपमधील अनेक आमदार तृणमूल काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी गेल्या आठवड्यात मुकुल रॉय यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला होता. आता त्यापाठोपाठ राजीव बॅनर्जी, दीपेंदू विश्वास, सुभ्रांशु रॉयसह अनेक नेते तृणमूलमध्ये येऊ शकतात. मुकुल रॉय यांनी भाजपच्या त‍िकिटावर निवडणूक लढवली असून ते कृष्णानगर उत्तर मतदारसंघातून जिंकून आले होते.

30 पेक्षा जास्त आमदार तृणमूलच्या संपर्कात
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मुकुल रॉय यांच्यासोबत ज्यांनी पक्ष सोडले होते परंतु, ते आता पक्षात येण्यास इच्छूक असेल अशाच लोकांचा विचार केला जाणार आहे. टीएमसी सूत्रांच्या माहितीनुसार, 30 पेक्षा जास्त आमदार तृणमूलच्या संपर्कात आहे. यापूर्वी सोनाली गुहा आण‍ि दीपेंदू विश्वास यांनी खूलेपणाने पक्षात परत येण्याबाबत सांगितले होते.

भाजप अध्यक्षांच्या बैठकीत अनेक आमदार गैरहजर
सूत्रांच्या माहितीनुसार, नुकतेच बंगालचे भाजप अध्यक्ष दिलीप घोष यांनी बोलावलेल्या बैठकीला पक्षाचे खासदार शांतनु ठाकूर आणि अन्य तीन आमदार उपस्थित नव्हते. मतुआ समाजाचे प्रमुख नेते आण‍ि खासदार शांतनु ठाकूर विधानसभा निवडणुकीपूर्वी बंगालमध्ये सीएए कायदा लागू करण्याच्या भाजपच्या भूमिकेबाबत नाराज होते. यावितिरिक्त विश्वजित दास (बागडा), अशोक कीर्तनिया (बोणगाव उत्तर) आणि सुब्रत ठाकूर (गायघाटा) या तीन आमदारांच्या नावांची चर्चा होत आहे.

बातम्या आणखी आहेत...