आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • West Bengal Ram Navami Violence; Hanuman Jayanti Hooghly Janakpuri | Mamata Banerjee

हनुमान जयंतीवर केंद्राचा राज्यांना सल्ला:वातावरण खराब करणाऱ्यांवर लक्ष ठेवा; कोलकाता HC म्हणाले- बंगालने केंद्राकडून फोर्स मागवावी

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील अनेक राज्यांमध्ये रामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसाचारानंतर गृह मंत्रालयाने बुधवारी सर्व राज्यांसाठी एक सूचना जारी केली आहे. हनुमान जयंतीला शांतता नांदण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी, असे मंत्रालयाने म्हटले आहे. जातीय सलोखा बिघडवणाऱ्यांवर व त्यासंबंधित प्रत्येक गोष्टींवर लक्ष ठेवा. असे आदेशात म्हटले आहे.

कोलकाता हायकोर्टाने दिले ममता सरकारला आदेश

दरम्यान, रामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसाचारानंतर कोलकाता उच्च न्यायालयाने बुधवारी हनुमान जयंती संदर्भात पश्चिम बंगाल सरकारला आदेश दिला. उच्च न्यायालयाने बंगाल सरकारला आदेश दिला की, केंद्र सरकारकडून फोर्स मागवावी. न्यायालयाने बंगाल सरकारला सांगितले की, जर राज्यात पोलिसांची संख्या पुरेशी नसेल, तर तुम्ही निमलष्करी दलाची मदत घेऊ शकता. शेवटी, आम्हाला राज्यातील नागरिकांची सुरक्षा हवी आहे.

रामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसाचाराचा दाखला देत न्यायालयाने सरकारला प्रश्न केला. कोर्ट म्हणाले - तुम्ही म्हणत आहात की, आम्ही काही लोकांना अटक केली आहे. आम्हाला काही न्यायाधीशांची पत्रे मिळाली आहेत. त्यांच्या घराजवळ दंगली होत असल्याचे त्यांनी सांगितले. न्यायालयाच्या आवारातही असेच वातावरण निर्माण झाल्यावर काय होणार. त्यावर काहीतरी ठोस केले पाहिजे. मिरवणुकीच्या मार्गांवर बॅरिकेड्स लावले. पोलिस शांतता पथसंचलन काढू शकतात. जेणेकरून लोकांना आपण सुरक्षित आहोत असे वाटेल.

दिल्लीतील जहांगीरपुरी भागातील हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवर बंदी
दिल्लीत हनुमान जयंतीच्या एक दिवस आधी दिल्ली पोलिसांनी जहांगीरपुरीमध्ये फ्लॅग मार्च काढला. 6 एप्रिल रोजी हनुमान जयंतीला जहांगीरपुरी परिसरात मिरवणूक काढण्यासाठी पोलिसांनी विश्व हिंदू परिषद आणि अन्य गटाला परवानगी नाकारली.

बंगालमधील हिंसाचाराच्या घटना क्रमश: घ्या जाणून....

30 मार्च : हावडा, उत्तर दिनाजपूर आणि इस्लामपूरमध्ये मिरवणुकीदरम्यान हिंसाचाराच्या घटना घडल्या. येथे मिरवणुकीत दोन गटात जोरदार दगडफेक झाली. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला, तर पाच-सहा पोलिस जखमी झाले. हिंसाचारात तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले होते.

31 मार्च : हावडा येथील शिबपूरमध्ये दगडफेक आणि जाळपोळीची आणखी एक घटना समोर आली आहे. येथे एका गटाने मंदिरांची तोडफोड केली आहे. यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसरात फ्लॅग मार्च काढला. त्यामुळे दोन्ही घटनांमध्ये 38 जणांना अटक करण्यात आली.

2 एप्रिल : रिसडा मिरवणुकीत दोन गटात हिंसक हाणामारी झाली. दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक करून वाहनांची जाळपोळ केली. दगडफेकीत भाजप आमदार बिमान घोष जखमी झाले. हुगळी आणि परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे.

3 एप्रिल : पश्चिम बंगालमधील हावडा येथे रामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसाचार आणि बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्य सरकारकडून अहवाल मागवला.

अन्य बातम्या देखील वाचा

बंगालच्या हुगळीत पुन्हा हिंसाचार:दगडफेकीनंतर रिशरा रेल्वे स्थानक बंद

पश्चिम बंगालमध्ये सलग तिसऱ्या दिवशी हिंसाचार सुरू आहे. हुगळीच्या रिशरा भागात सोमवारी रात्री उशिरा रेल्वे स्टेशनबाहेर दगडफेक झाली. त्यामुळे रेल्वे स्थानक बंद करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्टेशनच्या गेट क्रमांक 4 च्या बाहेर ही दगडफेक झाली. - येथे वाचा संपूर्ण बातमी

आदेश : SC म्हणाले- सरकारच्या धोरणांवर टीका करणे देशविरोधी नाही; केरळ हायकोर्टाचा निर्णय रद्द

मल्याळम वृत्तवाहिनीवरील केंद्र सरकारची बंदी सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी उठवली. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले - सरकारच्या धोरणांवर आणि पावलांवर टीका करणे देशविरोधी म्हणता येणार नाही. - येथे वाचा संपूर्ण बातमी

तणाव : छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुऱ्यामध्ये दंगल, जमावाने पोलिसांच्या 9 गाड्या जाळल्या, गोळीबारात एक जखमी

शहराच्या नामांतराच्या महिन्याभरानंतर शहरात तणाव निर्माण झाला. किराडपुऱ्यात रामनवमीच्या तयारीसाठी जमलेल्या युवकांच्या गटाचा दुसऱ्या गटाशी वाद झाला. काही क्षणातच परिसरात दंगल पेटली. अनियंत्रित झालेल्या गटाने पोलिसांवरही हल्ला केला. त्यांची वाहने दगडफेक करुन फोडली. या हल्ल्यात २ पोलिसांसह पाच ते सहा जण जखमी झाले. रात्री ११.३० वाजता सुरू झालेला हा हिंसाचार पहाटे ३.३० वाजेपर्यंत सुरू होता. - येथे वाचा संपूर्ण बातमी