आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ममता बॅनर्जींची मोठी घोषणा:पश्चिम बंगालमध्ये 7 नवीन जिल्ह्याची निर्मिती

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात 7 नवीन जिल्हे निर्माण करण्याची घोषणा केली आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या की बंगालमध्ये पूर्वी 23 जिल्हे होते, आता ते 30 करण्यात आले आहेत. 7 नवीन जिल्ह्यांमध्ये सुंदरबन, इचमेटी, राणाघाट, बिष्णुपूर, जंगीपूर, बेहरामपूर आणि बसीरहाट यांचा समावेश आहे.

ममता यांनी मे महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी पश्चिम बंगाल नागरी सेवा अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्या बैठकीतही त्यांनी जिल्ह्यांची संख्या वाढवण्याची गरज असल्याचे सांगितले होते. ममता म्हणाल्या होत्या की, सध्या राज्यात 23 जिल्हे आहेत, त्यांचे क्षेत्रफळ खूप मोठे आहे. त्यामुळे जिल्ह्यांचे विभाजन करून त्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे. राज्याला अधिक मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांची गरज असल्याचेही ममता यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितले होते. अशा परिस्थितीत जिल्ह्यांचे विभाजन करण्याची गरज आहे. जिल्हे वाढवल्यास विकासकामांना गती मिळेल. अशातच आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी 7 नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीची घोषणा केली.

मंत्रिमंडळ विस्तार
याशिवाय, ममता बॅनर्जी यांनी बुधवारी मंत्रिमंडळ विस्तार करण्याची घोषणा केली आहे. सरकारमधील अनेक मंत्र्यांच्या जागा रिक्त आहेत. त्या स्वतः सर्व विभागांचे कामकाज पाहू शकत नाहीत. त्यामुळे मंत्रिमंडळात नव्या 4 ते 5 चेहऱ्यांना संधी दिली जाईल, असे त्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर बोलताना म्हणाल्या.

पार्थ चॅटर्जी यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी
विशेष म्हणजे ममता बॅनर्जी यांनी नुकतेच पार्थ चॅटर्जी यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली आहे. शिक्षक भरती घोटाळ्यात आरोपी आढळल्यानंतर ममता यांनी त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकले. मात्र, पार्थला हटवण्यात उशीर झाल्यामुळे ममता बॅनर्जींना टीकेला सामोरे जावे लागले.

बातम्या आणखी आहेत...