आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करिअर फंडा:तरुणांसह लहान मुलांमध्ये वाढतं 'नैराश्य', ही एक गंभीर समस्या; वेळीच सावध व्हा अन् उपाययोजना करा

शिक्षणतज्ज्ञ संदीप मानुधनेएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक

आधुनिक काळात दिवसेंदिवस लहान मुलांसह तरुणांमध्ये नैराश्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. पण या नैराश्याकडे एक संवेदनाहीन व्यक्ती याला जोक म्हणून पाहील किंवा त्याच्या गांभीर्याकडे दुर्लक्ष करेल. परंतू याकडे दुर्लक्ष केल्याने होणारे परिणाम घातक असू शकतात.

आज आपण या गंभीर समस्येवर लक्ष घालूया, नैराश्याचे लक्षणे काय आहेत, त्याची कारणे काय असू शकतात आणि पालक त्यात काय करू शकतात.

"डिप्रेशन" म्हणजे काय

नैराश्य हा एक सामान्य आणि गंभीर वैद्यकीय आजार आहे ज्याचा शरीरावर नकारात्मक परिणाम होतो आणि तुमच्या भावना, विचार आणि कृतीवर परिणाम होतो. ही एक वैद्यकीय स्थिती आहे आणि त्यावर योग्य वैद्यकीय उपचार आहेत. परंतु लक्षात ठेवा, अनेक वैद्यकीय परिस्थिती (जसे की थायरॉईड समस्या, मेंदूतील गाठी किंवा व्हिटॅमिनची कमतरता) नैराश्यासारखी लक्षणे दिसू शकतात, त्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञांची मदत घेणे महत्त्वाचे राहील.

तुम्ही सर्वात वाईट काय करू शकता

पालक किंवा शिक्षक हे सर्वात वाईट गोष्ट करू शकतात, जे खरोखरच उदासीन असलेल्या मुलाकडे दुर्लक्ष करणे होय. "तु अभ्यास टाळण्याचे निमित्त काढत आहेस" अशी त्याची चेष्टा करा. त्याचे परिणाम घातक असतील. काही नामांकित लोक देखील 'डिप्रेशन' या विषयावर बोलण्यास तयार नाही. तर नैराश्याची ते खिल्ली उडवताना दिसून येतात. से लोक समाजाचे शत्रू आहेत. कारण ते एखाद्या जीवघेण्या आजाराकडे दुर्लक्ष करण्यास प्रवृत्त करतात. शिक्षणतज्ज्ञ संदीप मानुधने पुढे सांगतात की, त्यांच्या अध्यापनाच्या कारकिर्दीत त्यांनी नैराश्याची अनेक प्रकरणे पाहिली आहेत. तसेच योग्य हाताळणी केल्याने अनेक मुले देखील यातून सावरले आहेत. तर त्यांना बिघडण्यापासून वाचवता आले.

नैराश्य का येते

शाळकरी मुलांच्या नैराश्याची अनेक संभाव्य कारणे आहेत. त्यात काही कारणांचा समावेश करता येईल

1) आनुवंशिकता : या विकाराचा कौटुंबिक इतिहास असल्यास मुलांना नैराश्य येण्याची शक्यता असते.

2) जीवनातील घटना : एखाद्या प्रिय व्यक्तीचे नुकसान, गैरवर्तन किंवा गुंडगिरी यासारख्या क्लेशकारक घटनेचा अनुभव आल्यानंतर मुलांना नैराश्य येऊ शकते.

3) जुनाट आजार : जुनाट वैद्यकीय स्थिती असलेल्या मुलांना नैराश्य येण्याचा धोका जास्त असतो.

4) पर्यावरणीय घटक : जर मुले तणावपूर्ण घरातील वातावरणात राहत असतील किंवा त्यांना हिंसा किंवा गरिबीचा सामना करावा लागत असेल, तर त्यांना नैराश्य येण्याची शक्यता जास्त असते.

5) पालकांचे असलेले प्रेशर : काही प्रकरणांमध्ये असे दिसून आले आहे की पालकांनी सतत कामगिरीचा दबाव मुलावर ठेवला तर तो दबाव हळूहळू वाढतो आणि त्याचे नैराश्यात रूपांतर होते. बरेचदा ते कोचिंग क्लासेसशी संबंधित असते आणि परीक्षा पास होण्याच्या दबावामुळे परिस्थिती बिघडते.

नैराश्याचे लक्षणे काय असतात

 1. सतत दुःख किंवा निराशा :

जर एखादे मूल/मुल बरेच दिवस उदास राहिले आणि प्रत्येक गोष्टीत निराशा दिसून येत असेल तर ते नैराश्य असू शकते. अशा परिस्थितीत मुलाशी सतत बोलत राहा आणि त्याला आरामदायी बनवण्याचा प्रयत्न करा.

2. पूर्वीच्या आवडीनिवडी नष्ट होणे :

ज्या क्रियाकलापांमध्ये मूल पूर्वी रस घेत असे, ते आता घेत नाहीत. हे एक मोठे लक्षण आहे की काहीतरी बदलले आहे. बदल कशामुळे झाला याचा काळजीपूर्वक अभ्यास करा.

3) भूक आणि झोपेच्या पद्धतीत बदल :

पूर्वी आकर्षक वाटणारे पदार्थ आता करत नाहीत. पूर्वी जेवढे झोपायचे ते तास नाहीत. झोपेनंतरही अस्वस्थता आणि थकवा कायम राहतो. हे वास्तविक शारीरिक बदल आहेत.

4) चिडचिड किंवा राग :

प्रत्येक छोट्या-छोट्या मुद्द्यावर आता मूल पूर्वीसारखे शांत राहत नाही, तर लढायला तयार होते. अगदी योग्य सल्लाही आता टीका होताना दिसत आहे.

5) शारीरिक समस्या (पोट दुखणे, डोकेदुखी इ.) :

या शारीरिक समस्या सतत होत राहिल्यास, ही नैराश्याची लक्षणे असू शकतात.

सर्वात महतत्त्वाची बाब लक्षात ठेवण्याची आहे की, मुले नेहमी त्यांच्या भावना उघडपणे व्यक्त करू शकत नाहीत. त्याऐवजी ते त्यांच्या वर्तनातून किंवा शाळेच्या कामगिरीद्वारे त्यांचा त्रास दर्शवू शकतात.

त्वरीत उपाय काय करावे

 • 1) मुलाशी मोकळेपणाने बोला
 • 2) मुलांना अजिबात शिव्या देऊ नका
 • 3) मुलांना विश्वासात घ्या,
 • 4) त्यांना फिरायला घेऊन जा, त्यांच्यासोबत बोला संवाद साधा
 • 5) वैद्यकीय उपचाराची का गरज आहे त्याला समजावून सांगा

मुलांना नेहमी सातत्याने सांगत राहा की, आयुष्य खूप मोठे आणि संधींनी भरलेले आहे. एक विजय किंवा एक पराभवाने काहीही फरक पडत नाही.

मॅझिक स्टेटमेंट

नैराश्यात अडकलेल्या मुलावर वैद्यकीय उपचार घेत असताना हे मॅझिक स्टेटमेंट वारंवार करा

 • हसत राहा
 • प्रयत्न करा, त्रास देऊ नका
 • जग आपल्या आधीही होते, आपल्या नंतरही असेल
 • आपण जेवढे करू शकतो तेवढे करू, बाकीचे देवावर सोडा
 • जर आपण एक जीवन सुधारले तर आपले जीवन यशस्वी मानले जाईल.

आजच्या करिअर फंडामध्ये असे शिकता येईल की, डिप्रेशनमध्ये अडकलेल्या मुलांना तुमच्या मदतीची गरज आहे, त्यांना तुमच्या जवळ करा, त्याच्याशी संवाद साधा, योग्य उपचार द्या.

चला तर करून दाखवूया !

बातम्या आणखी आहेत...