आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वादग्रस्त वक्तव्य:‘ब्राह्मणांना ब्राह्मण म्हटल्यावर राग येत नाही, मग शुद्रांना शूद्र म्हटल्यावर राग का येतो? : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर

भोपाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जातीव्यवस्थेबाबत असलेल्या गैरसमजातून असे घडत आहे. त्यांना ही गोष्ट समजतच नाही : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा नवा वाद ओढावून घेतला आहे. त्यांनी मध्य प्रदेशच्या सिहोर येथील एका कार्यक्रमात जातीव्यवस्थेबाबत वक्तव्य केले आहे. ब्राह्मणांना ब्राह्मण म्हटले तर राग येत नाही, मग शुद्रांना शु्द्र म्हटल्यास राग का येतो? असे त्या म्हणाल्या. प्रज्ञासिंह यांच्य या वक्तव्यावरुन राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.

साध्वी प्रज्ञासिंह म्हणाल्या की, "प्राचीन काळी आपल्या धर्मग्रंथामध्ये समाजाच्या व्यवस्थेसाठी चार वर्ण तयार केले आहेत. क्षत्रियांना क्षत्रिय म्हटल्यास राग येत नाही, ब्राह्मणांना ब्राह्मण म्हटल्यास राग येत नाही, वैश्यांना वैश्य म्हटल्यास राग येत नाही, पण शुद्रांना शूद्र म्हटले तर त्यांना वाईट वाटते. याचे कारण काय आहे? असा सवाल करत जातीव्यवस्थेबाबत असलेल्या गैरसमजातून हे घडत आहे. त्यांना ही गोष्ट समजतच नाही, असे साध्वी प्रज्ञा यांनी म्हटले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser