आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • What Is Police Commemoration Day? Why And Since When Is It Celebrated On 21st October Every Year?

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिस स्मृती दिन:भारतीय पोलिस स्मृती दिन म्हणजे काय? दरवर्षी 21 ऑक्टोबरला का आणि कधीपासून केला जातो साजरा?

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाख येथे चीनच्या सैनिकासोबत लढतांना केंद्रीय राखीव दलाच्या दहा जवानांनी प्राणाची आहुती दिली होती.

देशासाठी आपले कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलिसांचे स्मरण ठेवण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी पोलिस स्मृतिदिन साजरा केला जातो.

21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाख येथे चीनच्या सैनिकासोबत लढतांना केंद्रीय राखीव दलाच्या दहा जवानांनी प्राणाची आहुती दिली होती. त्यानंतरपासून 21 ऑक्टोबर हा पोलिस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. वर्षभरात जे जवान देशात आणि राज्यात शहीद झाले अशा जवानांना या 21 ऑक्टोबर रोजी श्रद्धांजली वाहिली जाते. जिल्ह्याच्या मुख्यालयामध्ये या निमित्ताने शहीद पोलिसांना अभिवादन करण्यात येते. यासोबतच विविध उपक्रमाचे आयोजनही करण्यात येते.

2018 मध्ये, पोलिस स्मृतिदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीमध्ये पहिल्याच राष्ट्रीय पोलिस स्मारकाचे उद्घाटन केले. त्यांनी पोलिस दलांना आणि त्यांच्या कुटुंबियांना अभिवादन केले आणि देशातील लोकांना पोलिस म्यूझियम भेट देण्याचे आवाहन केले. आज राष्ट्रीय पोलिस मेमोरियलने 1947 नंतरपासून आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व केंद्रीय आणि राज्य पोलिस दलाच्या 34,844 पोलिस कर्मचाऱ्यांचे स्मरण केले.

महाराष्ट्र पोलिसांकडून अभिवादन
आपले कर्तव्य पार पाडत असताना देशासाठी प्राण गमावलेल्या हुतात्म्यांना पोलीस स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली आहे. 'हे राष्ट्र त्यांचे बलिदान कधीच विसरणार नाही.' असे म्हणत महाराष्ट्र पोलिसांनी अभिवादन केले आहे.