आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या महिन्यात वर्ल्ड हॅपिनेस अहवाल आला. त्यात फिनलंड सलग सहाव्या वर्षी आघाडीवर राहिला. नागरिक सुरक्षा, समाधान अनुभवतात अशा अनेक गाेष्टी आहेत. समग्रपणे या गाेष्टींकडे लाेक आनंदाच्या रूपाने पाहतात. फिनलंडचे नागरिक सामाजिक सुरक्षा पद्धती, खेळ, संगीत, व्यक्तिगत आनंद व मानसिक लाभाविषयी बाेलतात. वेल िबइंगविषयी अभ्यास केल्यावर ईस्ट फिनलंड युनिव्हर्सिटीचे प्राे. आर्टाे सेलाेनेन म्हणाले, नागरिक दर्जेदार जीवनाचा अनुभव घेतात. मूलभूत गरजांची पूर्तता झाल्याने नागरिक स्वत:ला यशस्वी मानतात. एकूणच पुरेसे काय आहे हे समजल्यावर आनंद अनुभवता येताे. ते आनंदाला असे परिभाषित करतात....
छंदाचे करिअरमध्ये रूपांतर करण्यासाठीही सरकारची मदत ‘क्वालिटी आॅफ लाइफ’ देशाच्या कल्याणकारी व्यवस्थेत समाविष्ट झालेली दिसते. यातूनच लाेकांना समाजात उपेक्षित वाटत नाही. उलट सुरक्षित वाटते, असे टुर्कु येथील रहिवासी डिझाइन फर्मचे सीईआे टिमू किस्की यांना वाटते. कला तसेच शिक्षणासाठी सरकारी निधी मिळताे. त्यामुळे कलाकारांना आपल्या कलेच्या अभिव्यक्तीची इच्छा पूर्ण करता येते. त्याचे स्वातंत्र्य मिळते. म्हणूनच कलेच्या क्षेत्रातील लाेकांना कलेच्या व्यावसायिक मूल्याविषयी विचार करण्याची गरज भासत नाही, असे किस्की यांना वाटते. त्यातून देशात कलाकारांची संख्या वाढली आहे. फार्म, डेअरी क्षेत्रातून निवृत्त ७४ वर्षीय टुआेमाे पुटियाे देशाच्या शालेय व्यवस्थेला धन्यवाद देतात. शाळेतूनच मुलांना संगीत शिक्षण मिळते. माझी मुलगी मारजुक्काचे संगीतात करिअर करण्याचे स्वप्नही यामुळेच सत्यात उतरू शकले.
मारजुक्का म्हणाल्या, शेतकऱ्याची मुलगी असूनही सेलाे (व्हायाेलिनसारखे वाद्य) वादनाची संधी मिळावी हे याच देशात शक्य हाेते. फिनलँडमध्ये संगीत अनेक लाेकांच्या सुखी जीवनाचे माध्यम ठरले आहे. अनेक लाेक समूह गीत सादर करतात. असंख्य लाेक सांगितिक वाद्य शिकतात. काही तर नियमितपणे संगीत कार्यक्रमात सहभागी हाेतात. माजी आॅलिम्पिक खेळाडू व अॅथलिट हेलिना मार्जम्मा म्हणाल्या, नैसर्गिक साधनसंपत्ती हे येथील आनंदाचे माेठे कारण आहे.
देशाचा ७५ टक्के भाग वनक्षेत्राने व्यापलेला आहे. त्याशिवाय एव्हरीमेन्स राइट याचीही माेठी भूमिका आहे. देशातील काेणत्याही वनराईच्या भागात काेणत्याही व्यक्तीला भटकंती करण्याचे स्वातंत्र्य आहे. ६६ वर्षीय हेलिना म्हणाल्या, निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने मला आत्मविश्वास वाटताे. पक्ष्यांचे सुस्वर कानी पडतात, बर्फ वितळू लागला आहे. जणू निसर्ग जीवनात रूपांतरित हाेत आहे. हे सगळेच अविश्वसनीय वाटावे असे साैंदर्य आहे.
ताेहाेलंपीचे रहिवासी असलेल्या हुकारी कुटुंबासाठी सकारात्मकतेचे कारण काहीसे खासगी आहे. ग्रामीण भागात राहून देखील मुलांसाठी दर्जेदार खेळ सुविधा उपलब्ध हाेणे त्यांच्या भविष्यासाठी लाभदायी ठरली आहे. त्यांची १६ वर्षीय मुलगी हेन्ना व १३ वर्षीय मुलगा निकलासने युराेपीय पातळीवरील स्पर्धेत उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. यातूनच संपूर्ण युराेपला माेठ्या संख्येने दर्जदार खेळाडूही मिळतात. त्याशिवाय देशभरात त्यांना लाेकांना भेटणे आणि त्यांना जाणून घेण्याची संधीही मिळते. लेसे व मारिका हुकारी हे आई-वडील आता मुलांच्या भविष्याबद्दल निश्चिंत झाले आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.