आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अयाेध्येत पंतप्रधान नरेंद्र माेदींनी १६१ फूट उंचीच्या प्रस्तावित श्रीराम जन्मभूमी मंदिराचे भूमिपूजन केले हाेते, परंतु त्यास १३८ दिवस उलटूनही मंदिराच्या पायाबाबत दिरंगाई केली जात आहे. त्यावरून अनेक प्रश्न निर्माण केले जात आहेत. लार्सन अँड टुब्राे (एलअँडटी) सारख्या प्रतिष्ठित संस्थेने मंदिराच्या पायासाठी भूमिगत खांबांची डिझाइन केेंद्रीय भवन संशाेधन संस्था रुरकी व आयआयटी चेन्नई, एनआयटी सुरतच्या मदतीने केली हाेती. या गाेष्टीच्या चार महिन्यांनंतर परीक्षण केल्यानंतर आता तज्ञांची उच्चस्तरीय समिती साेमवारी आपला अहवाल निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांना साेपवणार आहे. नियोजित जागेत पायाखाली वाळू व पाणी असल्याने समस्या आहे. मंदिराचे आर्किटेक्ट सीबी साेमपुराचे पुत्र निखिल साेमपुरा म्हणाले, साेमपुरा मंदिर शास्त्रात पारंपरिक पद्धतीने चुना आणि दगडांपासून पाया उभारला जाताे. काही मंदिरांत आम्ही आधुनिक पद्धतीचादेखील प्रयाेग केला आहे. भव्य श्रीराम मंदिराबाबत सांगायचे झाल्यास पाया नेमका कसा असावा ? यावर तज्ञ समितीच्या अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे. कारण, पाया तयार करणाऱ्या एजन्सीच्या मते जन्मस्थानाच्या जमिनीत भारवहन करण्याची क्षमता कमी आहे. सर्वांचे वेगवेगळे मत आहे. आम्ही यात काही करू शकत नाही. मध्य प्रदेशातील जबलपूरचे आर्किटेक्ट स्नेहिल पटेल म्हणाले, राम मंदिराच्या पाया उभारणीत पायाची डिझाइन हाच अडसर आहे. पटेल यांनी देशातील सर्वाधिक उंचीचे जैन मंदिर उभारले. ते २६८ फूट उंच आहे. ट्रस्टने पायाच्या खांबांसाठी सुरुवातीचा खर्च म्हणून एल अँड टीला २९.५ काेटी रुपये दिले आहेत. एल अँड टीने १४-१५ सप्टेंबरला टेस्टिंगसाठी दाेन ठिकाणांवर १० टेस्ट पिलर तयार केले आहेत. हे खांब एक मीटर रुंद व १०० फूट लांबीचे आहेत.
सिमेंट काँक्रीटपासून ते तयार करण्यात आले आहेत. २८ िदवसांनंतर त्याच्या बळकटीबाबतची तपासणी तज्ञांद्वारे करण्यात आली. हे खांब समाधानकारक नसल्याचे तपासणी अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर मातीबाबतचे प्रश्न निर्माण झाले. वास्तविक या संस्थेने पाया पक्का राहण्यासाठी सर्वात आधी मातीचे परीक्षण करायला हवे हाेते. ट्रस्टने मंदिर बांधकामावरील निगराणीची जबाबदारी टाटा कन्सल्टिंग इंजिनिअरिंगकडे (टीसीई) साेपवली आहे. आता ट्रस्टने दिल्ली आयआयटीचे माजी संचालक व्ही. एस. राजू यांच्या अध्यक्षतेखाली ८ सदस्यीय समितीची स्थापना केली आहे.
समिती या मुद्द्यांवर देणार अहवाल
- मातीच्या अहवालाचा आढावा करावा.{भूकंपराेधी डिझाइनचे मूल्यमापन.
- देश-विदेशात बनलेल्या मंदिरांचे अध्ययन.
- एल अँड टीच्या प्रस्तावित पायाच्या पद्धतीचे परीक्षण. मंदिरासाठी याेग्य की अयाेग्य?
- पायाखाली विषारी रसायनांचा परिणाम व भूकंप बचाव उपायांचे परीक्षण.
- भूमिगत पाण्याचा हाेणारा परिणाम.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.