आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतासाठी सेमीफायनलची वाट बिकट:झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात पाऊस झाला तर काय होणार? जाणून घ्या संभाव्य समीकरण

स्पोर्ट्स डेस्कएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रिकेट संघाने बुधवारी बांगलादेशाचा पराभव करून टी-20 विश्वचषकातील सेमीफायनलच्या दिशेने एक मोठी उडी घेतली आहे. पण या नॉकआउट सामन्यात अद्याप त्याचे स्थान निश्चित झाले नाही. पाकिस्तान, बांगलादेश व दक्षिण आफ्रिका हे 3 संघ अद्याप या शर्यतीत आहेत.

पाकने गुरूवारी दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवल्यामुळे अनेक संघांसाठी सेमीफायनलसाठी पात्र होण्याची कवाडे खुली झाली आहेत. भारताने आपल्या शेवटच्या सुपर -12 सामन्यात झिम्बाब्वेविरोधात विजय संपादन केला, तर रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघांचे आपल्या ग्रुपमधील अव्वल स्थान अधिक बळकट होईल. पण या सामन्यावर पावसाने पाणी फेरले तर काय होईल? चला तर मग जाणून घेऊया समस्त भारतीय क्रीडा रसिकांच्या मनातील या कळीच्या प्रश्नाचे उत्तर...

यंदाच्या टी-20 विश्वचषकात पाऊस व्हिलन ठरला आहे. पावसामुळे अनेक सामन्यांवर पाणी फेरले आहे. ग्रुप-2 च्या सामन्यांवर पावसाचा फारसा प्रकोप झाला नाही. पण ग्रुप-1 मध्ये त्याच्यामुळे अनेक महत्त्वाचे अनिर्णित राहिले. यामुळे मोठ्या संघांना गुण विभागून द्यावे लागले. परिणामी सेमीफायनलसाठी पात्र ठरण्याच्या दृष्टिकोनातून या संघांना मोठे नुकसान सहन करावे लागले.

भारत 6 गुणांसह अव्वल

भारताच्या नावावर सध्या 6 गुण आहेत. ग्रुप-1 मध्ये सध्या तो क्रमांक-1वर आहे. तर 5 गुणांसह दक्षिण आफ्रिका 2, तर 4 गुणांसह पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारत-झिम्बाब्वेमधील सामना 5 षटकांचाही झाला नाही, तर दोन्ही संघांना विभागुण दिले जातील. त्यामुळे भारताकडे आणखी गुण मिळून त्याच्या खात्यात 7 गुण होतील.

यामुळे भारत सेमीफायनलसाठी पात्र होईल. पण ग्रुप विजेता म्हणून त्याच्या मार्गातील संकट संपणार नाही. दक्षिण आफ्रिकेकडे आपल्या आगामी सामन्यात चांगल्या रनरेटने नेदरलँडला हरवले, तर या संघाला ग्रुप-1मध्ये अव्वल स्थान पटकावण्याची संधी मिळेल.

...तर पाकला संधी

दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा नेदरलँडविरोधात पराभव झाला तर त्या स्थितीत पाकिस्तान व बांगलादेशच्या सामन्यातील विजेता सेमीफायनलमध्ये पोहोचेल. आफ्रिकेच्या विजयामुळे पाकिस्तान व बांगलादेश या दोन्ही संघांना स्पर्धेबाहेर फेकेल. कारण, दक्षिण आफ्रिका व भारत या दोन्ही संघांकडे समान 7 गुण होतील.

उल्लेखनीय बाब म्हणजे टी-20 विश्वचषकाच्या साखळी सामन्यांसाठी कोणत्याही सामन्यासाठी राखीव दिवस नाही. केवळ सेमीफायनल व फायनलमध्ये पाऊस झाल्याच्या स्थितीतच रिझर्व्ह डेची तरतूद आहे.

सेमीफायनलमध्ये पाऊस झाला तर काय?:दोन्ही डावांत प्रत्येकी 10 षटकांचा खेळ होणे गरजेचे, पाऊस झाल्यास ग्रुप स्टेजचा निकाल महत्त्वाचा

टी-20 विश्वचषकाच्या ग्रुप स्टेजचे सामने 6 नोव्हेंबरला संपुष्टात येतील. त्यानंतर 9 व 10 तारखेला 2 सेमीफायनल घेळले जातील. 13 नोव्हेंबर रोजी फायनलचा सामना होणार आहे. या नॉकआउट सामन्यांसाठी ICC ने नियम जारी केलेत. हे नियम ग्रुप स्टेजच्या सामन्यांहून वेगळे आहेत. पाऊस झाल्याच्या स्थितीत काय होईल? संपूर्ण सामन्यावर पाणी फेरले गेले तर काय?, अशा सर्वच प्रश्नांची उत्तरे यातून मिळाली आहेत.

बातम्या आणखी आहेत...