आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • WhatsApp Background Mic On Key Off… Will Check This; Questions About Privacy, Allegations Of Eavesdropping

रडारवर:व्हॉट्सॲपचा बॅकग्राउंड माइक ऑन की ऑफ... हे तपासणार; गोपनीयतेबाबत सवाल, बोलणे ऐकत असल्याचा आरोप

नवी दिल्ली17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप दोन कारणांमुळे केंद्र सरकारच्या रडारवर आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि ट्रायने व्हॉट्सॲपकडून उत्तर मागवण्याची तयारी केली आहे.

पहिले प्रकरण व्हॉट्सॲपच्या बॅकग्राउंड माइकचे आहे. ते रात्रीच्या वेळी तुमचे बोलणे ऐकत असल्याची शक्यता आहे. हा गौप्यस्फोट ट्विटरच्या एका अभियंत्याने केला आहे. हा अभियंता झोपलेला असताना त्याचा माइक ऑन होता. झोपेतून उठल्यानंतरही माइक बराच वेळ अॅक्टिव्ह होता. नंतर तो आपोआप बंद झाला. अभियंत्याने या संपूर्ण घटनाक्रमाचे स्क्रीन शॉट्स जारी केले आहेत. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान राज्य मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावून आक्षेप घेतला आणि व्हॉट्सॲपला उत्तर देण्यास सांगितले. सोबतच चौकशी करण्याचे आदेशही दिले. तथापि, गुरुवारी सायंकाळपर्यंत व्हॉट्सॲपला पत्र पाठवण्यात आले नव्हते. दुसरे प्रकरण स्पॅम कॉल्सशी संबंधित आहे. दूरसंचार नियामक संस्था ट्रायने स्पॅम कॉल्स व एसएमएसला लगाम लावण्याचे आदेश दूरसंचार कंपन्यांना दिल्यानंतर सोशल मीडियावर विशेषत: व्हॉट्सॲपवर स्पॅम काॅल्स वाढले अाहेत.

व्हॉट्सॲपचे थातूरमातूर उत्तर
अभियंत्याने केलेल्या दाव्याच्या उत्तरात व्हॉट्सॲपने फोनमध्ये व्हायरस होण्याची शक्यता वर्तवली आहे. सोबतच गुगलद्वारे याची चौकशी करण्यास सांगितले आहे. युजरच्या परवानगीनंतर मोबाइलच्या मायक्रोफोनचा वापर कॉल सुरू असताना किंवा एखादा मेसेज रेकॉर्ड करतानाच केला जातो, असे व्हॉट्सॲपने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे.

नवी समस्या... एसएमएसला लगाम, व्हॉट्सॲपवर स्पॅम कॉल वाढले
आयटी आणि दूरसंचार मंत्रालयाचे अधिकारी व्हॉट्सॲपवर इंटरनॅशनल स्पॅम कॉल वाढणे ही गंभीर बाब असल्याचे म्हणत आहेत. ट्रायने मोबाइल ऑपरेटर्सना स्पॅम कॉल व एसएमएसवर एआय फिल्टर्स लावण्यास सांगितले होते. तेव्हापासून व्हॉट्सॲपवर स्पॅम कॉलची संख्या वाढली. मोबाइल नेटवर्कवरही स्पॅम कॉल येणे अद्याप कमी झालेले नाही. व्हॉट्सॲपवर इंटरनॅशनल स्पॅम कॉल्समुळे युजर्सची चिंता वाढली आहे. कारण यापूर्वी व्हॉट्सॲपवर मेसेजिंगच्या माध्यमातून मोबाइलमध्ये बग टाकण्याची प्रकरणे समोर आली आहेत. स्पॅम कॉल्सना अधिक धोकादायक म्हटले जात आहे.