आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राजस्थानमध्ये अशोक गहलोत सरकार अल्पमतात आणण्याचे षडयंत्र व्हाट्सअप कॉलिंगच्या माध्यमातून रचण्यात आले. यामागचे कारण म्हणजे आमदारांचे फोन टॅप होत होते. पायलट समर्थक गटाची मिटिंग पूर्ण होताच आमदारांचे फोन ऑफ झाले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट समर्थक आमदारांचे मोबाईल शनिवारपासूनच ऑफ होण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर इतर शिल्लक आमदारांचे फोन रविवारी ऑफ करवण्यात आले. दुसरीकडे रात्री उशिरापर्यंत मुकेश भाकर, रामनिवास गवडीया, जीआर खटाना, पीआर मीना, हरीश मीनासहित इतर आमदारांचे फोन ऑफ आढळून आले.
मॅसेंजरचाही उपयोग
पायलट गटातील आमदारांना त्यांचे फोन टॅप होत असल्याचे माहिती होते. यामुळे व्हाट्सअप कॉलींगसोबतच मॅसेंजरचाही उपयोग करण्यात आला. आमदारांनी आपल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांकडून हे काम करून घेतले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.