आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • WhatsApp Chatbot MyGov Corona Helpdesk Now Lets You Find Nearest COVID 19 Vaccination Centre: How To Use, Other Details; News And Live Updates

लसीकरण केंद्र शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग:या 7 स्टेप्सला फॉलो करत शोधा सर्वात जवळचे लसीकरण केंद्र;  9013151515 वर हॅलो पाठवा

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हेल्पडेस्क हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांचे सतर्थन करत असून त्याची डीफॉल्ट भाषा इंग्रजी आहे. (फाईल)

देशातील अनेक राज्यात 1 मे पासून 18 ते 45 वर्षे वयोगटातील लोकांचे लसीकरण सुरू झाले आहे. दरम्यान, यासाठी लसीकरणापूर्वी नोंदणी करणे आवश्यक आहे. परंतु, ज्या लोकांना नोंदणी करणे अशक्य आहे. अशा लोकांना आता आधारकार्डच्या मदतीने लसीकरण केले जाऊ शकते. परंतु, आता आपण घरबसल्या या 7 स्टेप्सला फॉलो करत सर्वात जवळचे लसीकरण केंद्र शोधता येणार आहे. कारण आता व्हॉट्सॲपने MyGov Corona Helpdesk सुरु केली आहे. त्यामुळे आपल्याला आता घरांजवळील लसीकरण शोधण्यास मदत होणार आहे.

MyGovIndia सोशल मीडियावर शेअर करत सांगितले की, व्हॉट्सअ‍ॅपवर MyGov Corona Helpdesk आता लोकांना जवळच्या लसीकरण केंद्राबद्दल सांगेल. हेल्पडेस्क हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांचे समर्थन करत असून त्याची डीफॉल्ट भाषा इंग्रजी आहे.

कोविड लसीकरण केंद्र शोधण्यासाठी या 7 स्टेप्स फॉलो करा
1. सर्व प्रथम आपल्या मोबाईलमध्ये 9013151515 हा नंबर सेव्ह करा. हे कोणत्याही नावाने सेव्ह करता येऊ शकते.

2. नंबर सेव्ह केल्यानंतर तुमचे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट उघडा. आपण ते वेब आवृत्तीमध्ये देखील उघडू शकता.

3. आता सेव्ह केलेल्या नंबरच्या चॅट बॉक्सवर जा म्हणजेच 9013151515 या नंबर हाय, हॅलो किंवा नमस्ते टाइप करुन येथे पाठवा.

4. आता चॅटबॉट तुम्हाला 9 पर्यायांना प्रत्युत्तर देईल. लसीकरणाच्या माहितीसाठी, 1 लिहा आणि पाठवा.

5. आता चॅटबॉट तुम्हाला 2 पर्याय देईल. केंद्राच्या माहितीसाठी आपल्याला 1 लिहून पाठवावे लागेल.

6. आता आपल्या क्षेत्राचा किंवा शहराचा पिन कोड प्रविष्ट करा. आपल्याला लसीकरण केंद्राची माहिती मिळेल.

7. जर तुमची नोंदणी झाली नसेल तर चॅटबॉट कोविन पोर्टलची लिंक देईल. आपणाला येथूनही नोंदणी करता येऊ शकेल.

बातम्या आणखी आहेत...