आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • WhatsApp, FB And Instagram Around The World Closed For About 6 Hours; The Service Was Interrupted Due To DNS Routing Issues

वर्षातील सर्वात मोठे आउटेज:व्हॉट्सॲप, FB आणि इन्स्टाग्राम सुमारे 6 तास बंद झाल्यानंतर सुरू झाले; सीईओ झुकेरबर्ग यांनी युजर्सची मागितली माफी

नवी दिल्ली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲप प्लॅटफॉर्म संपूर्ण जगभर सुमारे एक तास बंद राहिले, ज्यामुळे कोट्यवधी युजर्सला समस्यांना सामोरे जावे लागले. सोमवारी रात्री 9.15 च्या सुमारास ही समस्या समोर आली. यानंतर लोकांनी लगेच ट्विटरवर प्रतिक्रिया देणे सुरू केले. या आउटेजचा परिणाम अमेरिकन बाजारातील फेसबुकच्या शेअर्सवरही दिसून आला आणि कंपनीचे शेअर्स 6%ने कमी झाले. फेसबुकचे जगभरात 2.85 अब्ज मासिक सक्रिय युजर्स आहेत. तर व्हॉट्सॲपचे 2 अब्ज आणि इंस्टाग्रामचे 1.38 अब्ज युजर्स आहेत.

याप्रकरणी फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्रामने स्पष्टीकरण दिले. व्हॉट्सॲपने म्हटले की, सध्या काही लोकांना समस्या येत असल्याचे आम्हाला माहीत आहे. फेसबुकने ट्वीट करत माफी मागितली आणि म्हटले की, काही लोकांना आमचे ॲप तसेच उत्पादनांपर्यंत पोहोचण्यास समस्या येत आहे हे आम्हाला माहीत आहे. आम्ही सर्व गोष्टी लवकरच सुरळीत करण्यासाठी काम करत आहोत. ही समस्या का उद्भवली हे रात्री उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही. तथापि, युजर्स सोशल मीडियावर वेगवेगळ्या गोष्टी मांडत आहेत. या सेवा बंद होताच युजर्स ट्विटरवर आले व ते तपासले. ट्विटरवर लोकांनी आपापले स्क्रीनशॉट्स शेअर केले होते आणि या तिन्ही सेवा सुरू नाहीत, असे सांगितले होते.

जगभरातील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सोशल मीडियावर
फेसबुक आणि त्याचे सर्व मीडिया प्लॅटफॉर्म रात्री उशिरापर्यंत बंद राहिल्याने जगभरातील युजर्सची मोठी अडचण झाली. या वर्षी जुलैच्या एका अहवालानुसार जगाच्या लोकसंख्येच्या ५६.८ टक्के लोक सोशल मीडियाचे ॲक्टिव्ह युजर्स आहेत. त्यात सर्वाधिक फेसबुकचे युजर्स आहेत.

सिनेटच्या समितीसमोर फेसबुकवर वक्तव्य
फेसबुकच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या व्हिसलब्लोअर फ्रान्सिस हॉगेन यांच्या मुलाखतीच्या प्रसारणानंतर व मंगळवारी सिनेटच्या समितीसमोर त्यांच्या वक्तव्याआधी सर्व्हर डाऊन झाले. हॉगेन यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुकबाबत हजारो पानांचे गोपनीय दस्तऐवज लीक केले आहेत. द्वेष, हिंसा व दुष्प्रचारासाठी आपल्या प्लॅटफॉर्मचा कशा प्रकारे वापर होत आहे याची संपूर्ण माहिती फेसबुकला आहे, पण कंपनी हे पुरावे दडवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप त्यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...